Corona Update: महाराष्ट्रात कोरोना रुग्णसंख्येनं गाठला दोन महिन्यातील उच्चांक

0

मुंबई,दि.7: Corona Update: महाराष्ट्रात (Maharashtra) पुन्हा एकदा कोरोना (Corona) रुग्ण संख्येत वाढ होत आहे. राज्यात मे महिन्याच्या शेवटच्या आठवड्यापासून कोरोना रुग्णसंख्येत लक्षणीय वाढ होत आहे. दिवसाला 200 – 500 असे आढळणारे रुग्ण आता हजारांच्या घरात पोहोचले आहेत. गेल्या दोन दिवसापासून हाच आकडा हजारापेक्षा जास्त आहे. तर आज राज्यातील कोरोना रुग्णसंख्येने गेल्या दोन महिन्यातील उच्चांक गाठला आहे. मंगळवारी राज्याच तब्बल 1 हजार 881 रुग्ण आढळून आले आहेत. तर मुंबईत 1242 रुग्णांची नोंद झाली आहे. मुंबईकरांसाठी हि चिंतेची बाब आहे.

आज 878 रुग्ण बरे झाले असून, राज्यात आजपर्यंत एकूण 77,39,816 करोनाबाधित रुग्ण बरे होऊन घरी परतले आहेत. यामुळे राज्यातील रुग्ण बरे होण्याचे प्रमाण (Recovery Rate) 98.02 टक्के एवढे झाले आहे. राज्यात आज शून्य कोरोना मृत्यूची नोंद झाली असून मृत्यूदर हा 1.87 टक्के इतका झाला आहे. आता राज्यातील कोरोना बाधित रुग्णाांची एकूण संख्या 78, 96, 114 इतकी झाली आहे.

रुग्णसंख्या वाढली

राज्यातील कोरोनाची सक्रिय रुग्णसंख्या देखील वाढताना दिसत आहे. राज्यात आज एकूण 8432 सक्रिय रुग्ण आढळले असून मुंबईत सर्वाधिक म्हणजे 5974 इतक्या सक्रिय रुग्णांची नोंद करण्यात आली आहे. त्या खालेखाल ठाण्याचा क्रमांक लागत असून ठाण्यामध्ये 1310 इतके सक्रिय रुग्ण आढळतात.


LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here