पगार न दिल्याने संतप्त कर्मचाऱ्याने जेसीबीने काय केले पहा

0

दि.16 : प्रत्येकजण पैशासाठी काम करतो. पैशाअभावी अनेक व्यवहार थांबतात. कर्मचाऱ्यांना वेळेवर पगार मिळणे अपेक्षित असते. पगार वेळेवर न झाल्यास अनेकवेळा कर्मचाऱ्यांनी संप केल्याचे अनेकांना माहीत आहे. पण एका कर्मचाऱ्याने मात्र पगारासाठी असं काही केलं आहे, ज्याचा आपण विचारही करू शकत नाही. बॉसने सॅलरी (Salary) देण्यास नकार देताच कर्मचाऱ्याची सटकली आणि त्यानंतर कर्मचाऱ्याने थेट जेसीबीच आणला.

संतप्त कर्मचाऱ्याचा व्हिडीओ म्हणून एक व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल (Viral video) होतो आहे. व्हिडीओत पाहू शकता एक व्यक्ती जेसीबी घेऊन येते आणि तिथं रांगेत उभ्या असलेल्या गाड्या उद्ध्वस्त करून टाकतो. त्याला असं करताना पाहून लोक तिथं धावत येतात.

त्याला थांबवण्याचा प्रयत्न करतात. पण तो कुणाचंच ऐकत नाही. काही वेळाने लोक त्याला पकडतात आणि त्याला असं करण्यापासून रोखतात.

@CrazyFunnyVidzz ट्विटर अकाऊंटवर हा व्हिडीओ शेअर करण्यात आला आहे. बॉसने सॅलरी देण्यास नकरा दिल्यानंतर असं कॅप्शन या व्हिडीओला देण्यात आलं आहे. या व्हिडीओचा संबंध बॉस, कर्मचारी आणि पगाराशी जोडला जातो आहे. पण खरंच या व्हिडीओमागे खरं काय आहे, ही व्यक्ती असं का करते आहे हे माहिती नाही.


LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here