मुंबई,दि.27: बॉलीवूड स्टार शाहरुख खानचा (Shah Rukh Khan) मुलगा आर्यन खानला (Aryan Khan) कॉर्डेलिया क्रूझ ड्रग्स प्रकरणात क्लीन चिट मिळाली आहे. नार्कोटिक्स कंट्रोल ब्युरो अर्थात NCB ने या प्रकरणी आरोपपत्र दाखल केले आहे, ज्यामध्ये आर्यन आणि इतर पाच जणांना क्लीन चिट देण्यात आली आहे, त्यांची नावे आरोपपत्रात नाहीत. त्याचाच अर्थ आर्यनला NCB ने क्लीन चिट दिली आहे.
एसआयटीला आर्यनविरुद्ध ठोस पुरावे मिळाले नाहीत. पुराव्याअभावी आरोपपत्रात ज्या लोकांची नावे समाविष्ट नाहीत, त्यात आर्यन खान व्यतिरिक्त अवीन साहू, गोपाल जी आनंद, समीर सैगन, भास्कर रोडा आणि मानव सिंघल यांचा समावेश आहे. या प्रकरणात एनसीबीने आर्यन खानसह अन्य 14 जणांना आरोपी बनवले होते. आर्यनला एनसीबीने 3 ऑक्टोबर रोजी मुंबईच्या किनारी भागात एका क्रूझ जहाजातून अटक केली होती. मात्र, नंतर त्यांची जामिनावर सुटका करण्यात आली.
एनसीबीने ड्रग्स प्रकरणी एकूण 14 जणांविरोधात गुन्हा दाखल केला होता. मात्र, चौकशीत 6 आरोपींविरोधात पुरावे मिळाले नसल्याचं एनसीबीने जारी केलेल्या प्रेस नोटमध्ये सांगितलं आहे. तसेच या 6 जणांची नावं आरोपपत्रातून वगळ्यात आली आहेत.
पुरावे न मिळाल्याने आरोपपत्रातून वगळण्यात आलेले ६ जण कोण?
1. आर्यन खान
2. अविन शुक्ला
3. गोपाल आनंद
4. समीर साईघन
5. भास्कर अरोरा
6. मानव सिंघल