5G In India: भारतात या महिन्यात 5G सेवा सुरु होण्याची शक्यता

0

दि.12: 5G In India: 5G सेवेचा लाभ लवकरच घेता येईल. बाजारात 5G मोबाईलची विक्री अगोदरच सुरू झालेली आहे. देशात लवकरच 5G सेवेचा लाभ येणार आहे. देशात आगस्ट- सप्टेंबर महिन्यापर्यंत 5G सेवा सुरु होण्याचा अंदाज वर्तवला जात आहे. सरकारी सुत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, 5G लाँच झाल्यानंतर या तंत्रज्ञानामुळे भारताला मोठा फायदा होणार आहे. याशिवाय जागतिक स्तरावरही भारताला याचा मोठा लाभ मिळणार आहे.

स्वदेशी 5G तंत्रज्ञान स्वदेशी 5G खाजगी कंपन्यांना जागतिक बाजारपेठेत आपले स्थान निर्माण करण्यास मदत करेल. देशातील पहिला 5G कॉल ऑगस्ट-सप्टेंबरमध्ये सुरु करण्याचा प्रयत्न असेल. यासाठी जून ते जुलै दरम्यान स्पेक्ट्रम लिलाव प्रक्रिया घेण्यात येणार आहे. दरम्यान, स्पेक्ट्रमचा लिलाव 20 वर्षांसाठी असेल किंवा 30 वर्षांसाठी असेल याबाबत कोणतीही स्पष्ट माहिती समोर आलेली नाही.

स्पेक्ट्रम म्हणजे रेडिओ फ्रिक्वेन्सी. याचा वापर करत वायरलेस सिग्नल जगभरातील कोणत्याही ठिकाणी पोहोचवता येतात. या सिग्नलचा वापर इंटरनेटसाठी महत्त्वाचा आहे. यामुळे तुमच्या मोबाईल फोनला सिग्नल अेनक किलोमीटर दूर असलेल्या दुसऱ्या व्यक्तीपर्यंत पोहोचतो. यामुळे स्पेक्ट्रम लिलाव ही महत्त्वाची प्रक्रिया मानली जात आहे.

स्पेक्ट्रम म्हणजे रेडिओ फ्रिक्वेन्सीचा वापर करत तुम्हाला मोबाइल डिव्हाइसवरून कॉल करणे आणि मॅप यासारख्या इतर सेवा सुरळीतपणे होण्यासाठी केला जातो. स्पेक्ट्रम म्हणजे रेडिओ फ्रिक्वेन्सी मधूनच सिग्नल दिले आणि मिळवले जातात. आता 5G साठी या स्पेक्ट्रमचा लिलाव होईल. त्यानंतर स्पेक्ट्रम विकत घेतलेल्या कंपनीकडून ग्राहकांना 5G सेवा मिळेल.

अर्थमंत्री निर्मला सीतारमण यांनी इंटरनेट सुविधा अधिक कार्यक्षम आणि वेगवान करण्यासाठी लवकरच भारतातही 5जी (5G) सुविधेचा लाभ घेता येणार असल्याची घोषणा केली होती. सीतारमण यांनी सांगितलं होतं की, 2022 मध्ये खाजगी टेलिकॉम कंपन्यांच्या 5G मोबाइल सेवांसाठी आवश्यक स्पेक्ट्रम लिलाव (Spectrum Auction) आयोजित केला जाईल.


LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here