Accident: पुणे-नाशिक महामार्ग ओलांडताना कारच्या धडकेत 5 महिलांचा मृत्यू

0

पुणे,दि.14: Accident: पुणे नाशिक महामार्गावर खरपुडी फाटा इथं भीषण अपघात घडला आहे. पायी रस्ता ओलांडताना अज्ञात वाहनाने 8 महिलांना जोरात धडक दिली आहे. या अपघातात 5 महिलांचा मृत्यू झाला आहे. तर, तीन महिलांवर रुग्णालयात उपचार सुरु आहेत. सोमवारी (13फेब्रुवारी ) रात्री 11 च्या सुमारास हा अपघात झाला आहे. याप्रकरणी खेड पोलीस अज्ञात कारचा शोध घेत आहेत.

मिळालेल्या माहितीनुसार, एका लग्न कार्यात काम करण्यासाठी 17 ते 18 महिला स्वारगेटहून पीएमपीएमल बसने खेडला गेल्या होत्या. शिरोली फाट्याजवळ या सर्व महिला उतरल्या. पण, अंधारात मार्ग ओलंडताना यातील वयस्कर महिला चाचपडत होत्या. त्याचवेळी पुण्याच्या दिशेने आलेल्या कारने आठ महिलांना धडक दिली.

पुणे शहरातून खेड तालुक्यातील शिरोली येथील मंगल कार्यालयात स्वयंपाकासाठी रात्रीच्या सुमारास या महिला येत होत्या. त्याचवेळी महिंद्रा कंपनीच्या कारने या महिलांना रस्ता ओलांडताना ठोकर देऊंन वाहन चालक रस्ता दुभाजक तोडून वाहनासह फरार झाला.

या भीषण अपघातात काही महिलांचा जागीच मृत्यू झाला. तर, रुग्णालयात उपचारासाठी दाखल केल्यानंतर काही महिलांचा मृत्यू झाला आहे. जखमी तीन महिलांवर रुग्णालयात उपचार सुरु आहेत. अपघातानंतर कार चालक पुन्हा पुण्याच्या दिशेने पसार झाला आहे. खेड पोलीस चालकाचा शोध घेत आहेत.


LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here