प्रवासी जीपचा टायर फुटून भीषण अपघात, 5 जणांचा मृत्यू

0

अक्कलकोटहून सोलापूरला येणाऱ्या जीपचा टायर फुटून भीषण अपघात

सोलापूर,दि.16: स्वामी समर्थांचे दर्शन करून अक्कलकोटहून सोलापूरला येत असलेल्या प्रवासी जीपचा भीषण अपघात (jeep accident at solapur) झाला आहे. जीपचा टायर फुटल्याने हा अपघात झाला आहे. हा अपघात इतका भीषण होता की अपघातात पाच प्रवाशांचा जागीच मृत्यू झाला आहे. तर अनेक प्रवेसी जखमी झाले आहेत.

अक्कलकोटहून सोलापूरकडे येणाऱ्या एमएच 13 एएक्स 1237 या जीपचा पुढील टायर फुटल्याने सोलापूर – अक्कलकोट रोडवर कुंभारी येथील इंडियन ऑईल पेट्रोल पंपासमोर गाडी उलटली. प्राथमिक माहितीनुसार या अपघातात चार ते पाच जण दगावल्याची भीती व्यक्त करण्यात येत आहे. कार्तिकी एकादशीनिमित्त पंढरपूर, अक्कलकोट व गाणगापूर असा प्रवास करणाऱ्या व्यक्तींचा यात समावेश आहे. एकूण प्रवाशांपैकी चार गंभीर जखमी व चारजणांचा मृत्यू झाल्याची शक्‍यता व्यक्त करण्यात येत आहे. अपघातात जखमी झालेल्या लोकांना नागरिकांनी जवळच्या दवाखान्यात हलवले असून, वळसंग पोलिस घटनास्थळी दाखल झाले आहेत.

या अपघातात 10 ते 15 प्रवाशी जखमी झाले आहेत. या अपघातानंतर जखमींना तात्काळ उपचारासाठी सोलापूर जिल्ह्यातील शासकीय रुग्णालयात दाखल केले आहेत. जखमींपैकी काहींची प्रकृती गंभीर असल्याची माहिती समोर येत आहे.


LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here