Train Accident: बंगालमधील जलपाईगुडीजवळ रेल्वे अपघात, 5 ठार 45 जण जखमी

0

दि.13: Bikaner express derailed: पश्चिम बंगालमधील जलपाईगुडीजवळ रेल्वे अपघात (Train Accident) झाला आहे. येथे बिकानेर-गुवाहाटी एक्स्प्रेसच्या (Bikaner express derailed) अनेक बोगी रुळावरून घसरल्या आहेत. या अपघातात पाच जणांचा मृत्यू झाला असून सुमारे 45 जण जखमी झाले आहेत. अधिकाऱ्यांनी ही माहिती दिली. पश्चिम बंगालमधील न्यू दोमोहनी आणि न्यू मयनागुड़ी रेल्वे स्थानकादरम्यान हा अपघात झाला. डबे रुळावरून घसरल्याने भीषण अपघात झाला आहे. या अपघातात एकूण 12 डब्यांचे मोठे नुकसान झाले आहे.

15633 क्रमांकाची गाडी बिकानेरहून गुवाहाटीकडे जात असताना सायंकाळी 5 वाजता हा अपघात झाला. ही ट्रेन बुधवारी बिकानेर जंक्शनहून निघाली होती आणि गुरुवारी संध्याकाळी गुवाहाटीला पोहोचणार होती. मृतांच्या नातेवाईकांना 5 लाख रुपये तर गंभीर जखमींना 1 लाख रुपयांची मदत जाहीर करण्यात आली आहे.

न्यू दोमोहनी आणि न्यू मयनागुड़ी स्थानकांदरम्यान संध्याकाळी 4.53 च्या सुमारास हा अपघात झाला. बचाव आणि मदतकार्य सुरू झाले. जखमींची संख्या सध्या स्पष्ट झालेली नाही. प्रत्यक्षदर्शींच्या मते, डझनहून अधिक लोक असू शकतात.

अपघातातील मृतांची नेमकी संख्या आद्याप अद्याप समजू शकलेली नाही. पण अपघाताची तीव्रता पाहता अनेकांचा मृत्यू झाल्याची भीती व्यक्त केली जात आहे. घटनास्थळी बचावकार्य सुरू करण्यात आले आहे. उलटलेल्या डब्यांमध्ये मोठ्या संख्येने प्रवासी अडकले असून अनेक जखमी झाले आहेत.

ट्रेन क्रमांक 15633 बिकानेर एक्सप्रेस मंगळवारी रात्री राजस्थानमधील बिकानेर येथून निघाली होती. गुरुवारी सकाळी 5.44 वाजता ही ट्रेन पाटणा रेल्वे स्थानकातून निघून दुपारी 2 वाजता किशनगंजला पोहोचली आणि तेथून गुवाहाटीकडे रवाना झाली. भारतीय रेल्वेने 8134054999 हा हेल्पलाइन क्रमांक जारी केला आहे. अजूनही अनेक लोक ट्रेनमध्ये अडकले असून, त्यांचे बचावकार्य सुरू आहे.


LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here