Worli Sea Link Accident: वांद्रे-वरळी सी लिंकवर भीषण अपघात, 5 ठार 10 जण जखमी

0

मुंबई,दि.5: वांद्रे-वरळी सी लिंकवर (Worli Sea Link Accident) भीषण अपघात होऊन 5 ठार 10 जण जखमी झाले आहेत. वांद्रे-वरळी सी लिंकवर भीषण अपघात झाला आहे. या अपघतात पाच जणांचा मृत्यू झाला असून दहाजण जखमी झाले आहेत. जखमी झालेल्यांपैकी तीन जणांची प्रकृती चिंताजनक आहे. वांद्रेहून वरळीच्या दिशेने जाणाऱ्य मार्गावर हा अपघात झाला आहे. एका मागून एक गाड्या एकमेकांवर आदळल्या आहेत. पहाटे साडे तीनच्या सुमारास हा अपघात झाला आहे. वरळीहून वांद्रेच्या दिशेने जाणारा मार्ग बंद करण्यात आला आहे.

आधी झालेल्या अपघातातील जखमींना नेण्यासाठी आलेल्या रुग्णवाहिकेला भरधाव वेगात आलेल्या तीन गाड्यांनी ठोकल्याने हा अपघात घ़डल्याची प्राथमिक माहिती मिळत आहे. या अपघातानंतर सी लिंक काही काळासाठी बंद करण्यात आला आहे. 

मिळालेल्या माहितीनुसार आज पहाटेच्या वेळी वांद्रे वरळी सी लिंकवर चार कार आणि ॲम्ब्युलन्सची भीषण टक्कर झाली. त्यात पाच जणांचा जागीच मृत्यू झाला. तर तीन जण गंभीर जखमी झाले आहे. 12 जणांना किरकोळ जखमा झाल्या आहेत. जखमींना रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.  

वांद्रे वरळी सी लिंकवर एका गाडीचा आधीच अपघात झाला होता. त्या अपघातातील जखमींना नेण्यासाठी रुग्णवाहिकेला बोलावण्यात आले होते. मात्र ही रुग्णवाहिका जखमींना घेऊन जाण्यापूर्वी तीन अजून कारनी येऊन रुग्णवाहिकेला धडक दिली. त्यामुळे सी लिंकवर गोंधळाचं वातावरण निर्माण झालं. य़ादरम्यान, अपघाताची माहिती पोलिसांना देण्यात आली. त्यानंतर मदत आणि बचाव कार्य सुरू करण्यात आले. तसेच सी लिंक काही काळासाठी बंद करण्यात आला.


LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here