4जी 5जी काय कोणताही जी माताजी, पिताजी पेक्षा मोठा नाही: मुकेश अंबानी

पंडित दीनदयाळ ऊर्जा विद्यापीठाच्या 10 व्या दीक्षांत समारंभात मुकेश अंबानी बोलत होते

0

दि.23: रिलायन्सचे (Reliance) मुकेश अंबानी (Mukesh Ambani) यांनी तरुणांना मोलाचा सल्ला दिला आहे. 4जी 5जी काय कोणताही जी माताजी, पिताजी पेक्षा मोठा नाही असे मुकेश अंबानी यांनी म्हटले आहे. Jio ने 4जी मध्ये मोठी क्रांती केली. Jio लाँच झाल्यानंतर अनेक कंपन्या बंद पडल्या. मोबाईल ग्राहकांची संख्या वाढली. 4जी वापरणाऱ्यांची संख्याही वाढली. अशात लवकरच देशात 5जी सेवा सुरू होणार आहे. काही शहरांमध्ये 5जी सेवा सुरू करण्यात आली आहे.

करोडो लोक जिओद्वारे इंटरनेट डेटा वापरत आहेत. हे प्रमाण येत्या काळात आणखी वाढणार आहे. याच अंबानींनी तरुणवर्गाला या 4जी, ५ 5जीवरून महत्वाचा सल्ला दिला आहे. देशातील तरुणाई 4जी, 5जी वरून खूप उत्साहित आहेत, परंतू त्यांना सांगू इच्छितो की माताजी, पिताजी पेक्षा कोणताही जी मोठा नाहीय. तरुणांनी त्यांच्या आई वडिलांनी केलेल्या त्यागाला विसरता नये, असा सल्ला अंबानी यांनी दिला. 

याचबरोबर त्यांनी 2047 पर्यंत भारत 40 ट्रिलियन डॉलरची अर्थव्यवस्था बनेल आणि जगातील पहिल्या तीन अर्थव्यवस्थांमध्ये सामील होईल, असे भाकीत केले. स्वच्छ ऊर्जा क्रांती, जैव ऊर्जा क्रांती आणि डिजिटल क्रांती आगामी काळात भारताच्या आर्थिक प्रगतीसाठी गेम चेंजर ठरतील, असेही ते म्हणाले. 

पंडित दीनदयाळ ऊर्जा विद्यापीठाच्या 10 व्या दीक्षांत समारंभात ते बोलत होते. यावेळी विद्यार्थ्यांना उद्देशून त्यांनी हा सल्ला दिला आहे. आज तुमचा दिवस आहे. पण तुमच्या पालकांनी या दिवसाची आतुरतेने वाट पाहिली आहे. त्यांच्या आयुष्यभराचे स्वप्न होते, त्यांचा संघर्ष आणि त्याग कधीही विसरू नका, असे अंबानी म्हणाले. भारताचा अमृत काळ सुरु असताना ही बॅच एका पदवीधर होत आहे. आपल्या परंपरेत अमृत काळ हा कोणत्याही नवीन कार्यासाठी शुभ मानला जातो. भारताची अभूतपूर्व आर्थिक वाढ होईल आणि संधींचा पूर येईल, असेही ते म्हणाले. 

स्वच्छ ऊर्जा क्रांती आणि जैव-ऊर्जा क्रांतीमुळे शाश्वत ऊर्जा मिळेल तर डिजिटल क्रांतीमुळे आपल्याला ऊर्जेचा वापर योग्यरीतीने करण्यास मदत होईल. AI, रोबोटिक्स आणि IoT सारखे तंत्रज्ञान आमूलाग्र बदल घडवून आणतील. त्यांचा उपयोग आपण आपल्या फायद्यासाठी केला पाहिजे, असे ते म्हणाले. 


LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here