इनोव्हा ट्रकच्या भीषण अपघातात ४ ठार

0

दि.१६: इनोव्हा ट्रकच्या भीषण अपघातात ४ जण ठार झाल्याची घटना घडली आहे. हरियाणाच्या गुरुग्राममध्ये वेगाच्या नशेने एक तरुणी आणि तीन तरुणांचा बळी घेतला आहे. या अपघातात दोन जण गंभीर जखमी झाले आहेत. इनोव्हा कारवर वेगाने येणारा ट्रक पलटी झाल्याने हा भीषण अपघात झाला आहे. जखमींना जवळच्या हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले आहे. 

मध्यरात्री १.४० वाजण्याच्या सुमारास हा अपघात झाला. विलासपूर पोलीस ठाणे हद्दीत हा अपघात झाला. पोलिसांना इनोव्हा कारवर ट्रक उलटला असल्याची माहिती देण्यात आली. त्यानंतर पोलीस घटनास्थळी पोहोचले. घटनास्थळी कार ट्रकखाली दबली गेली होती. 

पोलिसांनी तातडीने उपाययोजना करत कारमधून प्रवाशांना बाहेर काढले. परंतू, तोवर त्यातील एक तरुणी आणि तीन तरुणांचा मृत्यू झाला होता. तर त्यांच्यापैकीच एक तरुणी आणि तरूण गंभीर जखमी झाला आहे. पोलिसांनी मृतदेह ताब्यात घेऊन अपघाताची चौकशी सुरु केली आहे. 

हे तरुण राजस्थानच्या जयपूरला फिरण्यासाठी गेले होते. ते तेथून परत येत होते. सुट्या असल्याने ते पर्यटनासाठी गेले होते. पोलिसांनी सर्वांच्या नातेवाईकांना अपघाताची माहिती दिली आहे. 


LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here