2000 Note: RBI चा मोठा निर्णय, 2 हजारांची नोट चलनातून बंद होणार

0

नवी दिल्ली,दि.19: 2000 Note: RBI ने मोठा निर्णय घेतला आहे. 2 हजारांची नोट चलनातून बंद होणार आहे. भारतीय रिझर्व्ह बँकेने मोठा निर्णय घेतला आहे. आरबीआयने (RBI) बाजारातून 2000 रुपयांच्या नोटा मागे घेण्याचा निर्णय घेतला आहे. 30 सप्टेंबर 2023 पर्यंत नोटा वापरता येणार असल्याचे आरबीआयने म्हटले असल्याचे वृत्त ‘पीटीआय’ने दिले आहे. 2018-19 मध्येच 2000 रुपयांच्या नोटांची छपाई थांबवण्यात आली होती. नागरिकांना 2000 रुपयांच्या नोटा बदलून घेण्यासाठी तीन महिन्यांचा कालावधी आहे.

2000 Note चलनातून बंद

2016 साली देशभरात नोटबंदी झाल्यानंतर 500 आणि एक हजारच्या नोटा चलनातून रद्द करण्यात आल्या. या नोटाबंदीमुळे तूट भरून काढण्यासाठी आरबीआयने 2 हजार रुपयांच्या नोटांच्या छपाईला सुरूवात केली. 2018-19 सालीच आरबीआयने 2 हजार रुपयांच्या नोटांची छपाई बंद केली होती.

मार्च 2017 पर्यंत दोन हजार रुपयांच्या 89 टक्के नोटा चलनात होत्या, 31 मार्च 2018 ला ज्याची एकूण किंमत 6.73 लाख कोटी रुपये होती. 31 मार्च 2023 ला हीच रक्कम 3.62 लाख कोटी एवढी झाली, जी 10.8 टक्के होती.

23 मे 2023 पासून नागरिकांना बँकेमध्ये 2 हजार रुपयांच्या नोटा जमा करता येणार आहेत, एकावेळी नागरिकांना 20 हजार रुपयांपर्यंतच्याच 2 हजार रुपयांच्या नोटा बदलून मिळणार आहेत. तसंच बँकांनी आतापासूनच 2 हजार रुपयांच्या नोटा देणं बंद करावं, असे आदेशही आरबीआयने केले आहेत.


LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here