एकनाथ शिंदे शिवसेनेला देणार मोठा धक्का, 2 खासदार आणि 5 आमदार करणार शिंदे गटात प्रवेश

0

मुंबई,दि.5: एकनाथ शिंदे शिवसेनेला मोठा धक्का देणार असल्याचा दावा करण्यात आला आहे. शिवसेनेचे 2 खासदार आणि 5 आमदार शिंदे गटात प्रवेश करणार असल्याचा सांगण्यात आले आहे. शिवसेनेतील (Shivsena) फुटीनंतर आज ठाकरे आणि शिंदे गटाच्या मेळाव्यांकडे (Dasara Melava) राज्याचं लक्ष लागलंय. शिवसेनेत ठाकरेंना अभूतपूर्व आव्हान देणाऱ्या मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (CM Eknath Shinde) यांनी ठाकरेंना समांतर मेळावा भरवून मोठं आव्हान दिलंय. त्यामुळे यावेळचा त्यांचा मेळावाही ऐतिहासिक ठरणार आहे. या मेळाव्याला मुख्यमंत्री एकनाथ शिंदे संबोधित करणार आहेत. यातील खास बाब म्हणजे व्यासपीठावर बाळासाहेब ठाकरेंच्या नावाची खुर्ची राखीव ठेवण्यात आली आहे.

एकनाथ शिंदे यांच्या बरोबर शिवसेनेचे 40 आमदार व 12 खासदार गेले आहेत. एकनाथ शिंदे गटात अनेक पदाधिकाऱ्यांनी प्रवेश केला आहे. राज्यात खरी शिवसेना कोणाची यावरून वाद निर्माण झाला आहे. एकनाथ शिंदे यांनी आपणच खरी शिवसेना असल्याचा दावा केला आहे. अशातच आज होणाऱ्या दसरा मेळाव्यात शिवसेनेचे 2 खासदार व 5 आमदार शिंदे गटात प्रवेश करणार असल्याचा दावा खासदार कृपाल तुमाने यांनी केला आहे.

कृपाल तुमाने राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या विजयादशमीनिमित्त आयोजित कार्यक्रमात उपस्थित होते. गेल्या अनेक वर्षांपासून मोहन भागवतांचे विचार ऐकण्यासाठी येत असतो. हिंदूंचे रक्षण करण्यासाठी लढणाऱ्या संघटनेच्या प्रमुखांचे विचार ऐकून पुढे जावे यासाठी येत असतो. याआधी बाळासाहेबांचे विचार ऐकण्यासाठी आम्ही मुंबईत जायचो. पण आता बीकेसीमध्ये भव्य कार्यक्रमात एकनाथ शिंदेंच्या नेतृत्वात बाळासाहेबांचे विचार पुढे नेण्यासाठी सर्वजण एकत्र येतील, असा विश्वास कृपाल तुमाने यांनी व्यक्त केला. 

एका वृत्तवाहिनीशी बोलताना कृपाल तुमाने यांनी हा दावा केला आहे. एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वावर विश्वास ठेवून खासदार व आमदार प्रवेश करणार असल्याचे त्यांनी सांगितले. मात्र प्रवेश करणाऱ्यांची नावे त्यांनी सांगितली नाहीत. आज कोण प्रवेश करणार हे कळेच असे ते म्हणाले.

उद्धव ठाकरेंशी केलेल्या बंडानंतर एकनाथ शिंदेनी हे बाळसाहेबांच्या विचाराचे सरकार असल्याचे सांगितले होते. आज देखील मेळाव्यात बाळासाहेब ठाकरेंच्या नावाची खुर्ची राखीव ठेवत आम्हीच बाळासाहेबांचे शिवसैनिक अधोरेखित करण्याचा प्रयत्न केला जात आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे कायम आपल्या भाषणात हे बाळासाहेबांचे हिंदूत्व आणि दिघे साहेबांची शिकवणीनुसार चालणरे सरकार आहे. खरी शिवसेना आमचीच असल्याचे दाखवण्यासाठी शिंदे गटाने हा प्रयत्न केला असल्याची चर्चा आहे.


LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here