महाराष्ट्रातील या जिल्ह्यातील शाळेती १६ विद्यार्थी व तीन शिक्षकांना कोरानाची लागण

0

अहमदनगर,दि.२४: सर्दी खोकल्याचा त्रास सुरू झाल्याने शाळेतील विद्यार्थी व शिक्षकांची कोरोना चाचणी करण्यात आली यात १६ विद्यार्थी व ३ शिक्षकांचा चाचणी अहवाल पॉझिटिव्ह आला. पारनेर (Parner) तालुक्यातील टाकळी ढोकेश्वर येथील जवाहर नवोदय विद्यालयातील १६ विदयार्थी आणि ३ शिक्षकांना कोरोनाचा संसर्ग झाल्याचे आढळून आले आहे. त्यांची प्रकृती ठणठणीत असून त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. तर इतरांची तपासणी सुरू आहे, अशी माहिती तालुका आरोग्य अधिकारी डॉ. प्रकाश लाळगे यांनी दिली. यापूर्वी पाथर्डी तालुक्यातील जिल्हा परिषदेच्या प्राथमिक शाळेत सात विद्यार्थ्यांना कोरोनाची लागण झाल्याचे आढळून आले होते.

टाकळी ढोकेश्वरच्या नवोदय विद्यालयात राज्यभरातून ४०६ विद्यार्थी शिक्षण घेत आहेत. त्यातील काहींना सर्दी खोकल्याचा त्रास सुरू झाल्याने त्यांची चाचणी करण्यात आली. सायंकाळपर्यंत १६ विद्यार्थी आणि ३ शिक्षकांना कोरोनाची लागण झाल्याचे आढळून आले. इतरांची तपासणी सुरू होती. हे विद्यार्थी सहावी ते बारावी या वर्गातील आहेत. तेथील वसतिगृहात ते राहतात.

काही विद्यार्थ्यांना सर्दी खोकल्याचा त्रास होत होता. त्यामुळे त्यांची तपासणी करण्याचा निर्णय झाला. एक एक करता त्यांची संख्या वाढत गेली. त्यामुळे तालुका आरोग्य प्रशासनाने तेथे धाव घेतली. बाधित आढळून आलेल्या विद्यार्थ्यांना पारनेरच्या सरकारी रुग्णालयात हलविण्यात आले. तेथे राहणारे सर्व शिक्षक आणि विद्यार्थी यांचीही चाचणी करण्याचा निर्णय घेण्यात आला. ज्यांना बाधा झाली आहे, त्यांची प्रकृती उत्तम आहे. त्यांच्या पालकांना यासंबंधीची माहिती कळविण्यात येत आहे.


LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here