एक्स्प्रेस वेवर कारच्या भीषण अपघातात 10 जणांना मृत्यू

0

वडोदरा,दि.17: गुजरातमधील अहमदाबाद-वडोदरा एक्स्प्रेस वेवर नडियादजवळ एक भीषण रस्ता अपघात झाला आहे. यामध्ये 10 जणांचा मृत्यू झाला आहे. त्याचबरोबर एका व्यक्तीची प्रकृती गंभीर असल्याचे सांगण्यात येत आहे. मागून भरधाव वेगाने येणाऱ्या कारने ट्रेलरला धडक दिल्याने हा अपघात झाला. ही कार वडोदराहून अहमदाबादला जात होती.

कारमधील सर्व 10 जणांचा मृत्यू झाल्याचे पोलिसांनी सांगितले. यातील 8 जणांचा अपघातात जागीच मृत्यू झाला, तर दोघांचा रुग्णालयात नेत असताना मृत्यू झाला. अपघाताची माहिती मिळताच 108 च्या दोन रुग्णवाहिका घटनास्थळी दाखल झाल्या. याशिवाय एक्सप्रेस हायवे पेट्रोलिंग टीमही मदत आणि बचाव कार्यासाठी घटनास्थळी पोहोचली होती. अपघातामुळे एक्स्प्रेस वेवर जाम झाला होता. 


LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here