सेवाकर्मी कार्यक्रम गुणांकनात सोलापूर जिल्हा परिषद प्रथम 

0

सोलापूर,दि.१३: सेवाकर्मी कार्यक्रमाच्या गुणांकनामध्ये सोलापूर जिल्हा परिषदेने महाराष्ट्रात प्रथम क्रमांक पटकावून घवघवीत यश संपादन केले आहे. सर्व संवर्गांची अद्ययावत व ज्येष्ठता सूची, पदोन्नतीने नियुक्तीची स्थिती, सरळ सेवा नियुक्ती, रिक्त पदांची अद्ययावत माहिती, बिंदू नामावली प्रमाणीकरण, अनुकंपा नियुक्ती प्रक्रिया, आय-गोट पोर्टलवर १००% नोंदणी ,तसेच सर्व कर्मचाऱ्यांच्या सेवा पुस्तिकांचे अद्ययावत करणे आदी सर्व निकषांवर सोलापूर जिल्हा परिषदेने आपली प्रशासकीय गुणवत्ता सिद्ध केली आहे.

या उल्लेखनीय यशाबद्दल सोलापूर जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी कुलदीप जंगम यांचा सर्व महिला कर्मचारी वर्गाच्या वतीने भव्य सत्कार करण्यात आला. तसेच उपमुख्य कार्यकारी अधिकारी स्मिता पाटील यांचा सर्व कर्मचारी पुरुष बांधवांच्या वतीने सन्मानपूर्वक सत्कार करण्यात आला.

या गौरव सोहळ्यास मुख्य कार्यकारी अधिकारी कुलदीप जंगम, प्रकल्प संचालक जिल्हा ग्रामीण विकास यंत्रणा चंद्रशेखर जगताप, स्मिता पाटील (उपमुख्य कार्यकारी अधिकारी – प्रशासन), मीनाक्षी वाकडे (मुख्य लेखा व वित्त अधिकारी), संतोष कुलकर्णी (कार्यकारी अभियंता, बांधकाम विभाग) आदी मान्यवरांची प्रमुख उपस्थिती लाभली. उपस्थित सर्व मान्यवरांचा सत्कार सर्व कर्मचारी बांधवांच्या वतीने करण्यात आला.

महाराष्ट्रातील सर्वोत्तम कामगिरी करणाऱ्या कार्यालयांमध्ये सोलापूर जिल्हा परिषदेचे नाव प्रथम क्रमांकावर झळकल्याने संपूर्ण जिल्ह्यासाठी ही अत्यंत अभिमानाची बाब ठरली आहे. या यशामागे प्रशासनातील पारदर्शकता, काटेकोर नियोजन, आधुनिक तंत्रज्ञानाचा प्रभावी वापर आणि अधिकारी-कर्मचारी वर्गाची एकजूट हे महत्त्वाचे घटक ठरले आहेत.

या यशात मोलाचे योगदान देणाऱ्या सर्व अधिकारी व कर्मचाऱ्यांचा कुलदीप जंगम यांच्या शुभहस्ते विशेष सत्कार करण्यात आला. यामध्ये अविनाश गोडसे, सचिन साळुंखे, हनुमंत गायकवाड, श्रीधर कलशेट्टी, वैशाली रामपुरे, ममता काशेट्टी, नरेंद्र अकेले, महेश केंद्रे, शिवाजी राठोड, अरविंदकुमार सोनवणे, प्रदीप सगट, रामचंद्र गुरव, अर्चना निराळी, अश्विनी मुळीक, विजय पाटील, प्रतीक्षा कांबळे, नरसिंह गायकवाड, मनोज वडगावे, बसवराज भेंडी, जनबसव्वा, कल्याण अक्षय सोनकांबळे, वैशाली शिंदे, शाहू गायकवाड, लक्ष्मी शिंदे, संजय गौडगाव, वीरपक्षया स्वामी, अंजली पेठकर,श्रीदेवी महामुरे, साहेबराव देशमुख, बसवराज स्वामी, विक्रम शहा, रवी करजगी, पद्माकर बनसोडे, लक्ष्मण झिपरे, महेंद्र माने, रेवणसिद्ध म्हेत्रे आदी कर्मचारी बांधवांचा मुख्य कार्यकारी अधिकारी कुलदीप जंगम यांच्या शुभहस्ते सत्कार करण्यात आला.

सदर कार्यक्रम यशस्वी पार पाडण्यासाठी प्रशासन अधिकारी अविनाश गोडसे, सचिन साळुंखे व सर्व कर्मचारी वर्गाने विशेष परिश्रम घेतले. तसेच संपूर्ण कार्यक्रमाचे सूत्रसंचालन महताब शेख यांनी केले.


LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here