सोलापूर,दि.९: महाराष्ट्रातील १२ जिल्हा परिषद आणि १२५ पंचायत समित्यांचे निकाल आज जाहीर झाले असून यात भाजपचे उमेदवार सर्वाधिक निवडून आले आहेत. सोलापूर जिल्हा परिषदेवरही भाजपची सत्ता येणार आहे. सोलापूर जिल्हा परिषदेच्या निवडणुकीत ६८ जागांपैकी ३७ जागांवर भाजपचे उमेदवार विजयी झाले आहेत. तर राष्ट्रवादीचे ९ उमेदवार विजयी झाले आहेत.
उत्तर सोलापूर तालुक्यातील नान्नज आणि बीबी दारफळ जिल्हा परिषद गटातून भाजपचे उमेदवार विजयी. नान्नज गटातून चैताली मुळे तर बी बी दारफळ गटातून इंद्रजित पवार विजयी झाले आहेत.
बी बी दारफळ गटात राष्ट्रवादीचे उमेदवार, जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष बळीराम काका साठे यांना पराभवाचा धक्का बसला आहे. वडाळा पंचायत समिती गणात राष्ट्रवादी अजित पवार गटाच्या उमेदवार वैशाली शिलवंत विजयी झाल्या आहेत.
नान्नज गणातून भाजपचे सुनील भोसले, बी बी दारफळ गणातून सुनीता बारसकर, मार्डी गणातून तेजस्विनी बोराडे विजयी झाल्या आहेत.








