महिलांचे अश्लील न्यूड डान्स प्रकरण, पोलिसांनी केली मोठी कारवाई

0

नागपूर,दि.२४: महाराष्ट्रातील एका गावात अश्लील न्यूड डान्स कार्यक्रम आयोजित केल्याची घटना समोर आली आहे. याप्रकरणी पोलिसांनी सात जणांना अटक केली आहे. हे प्रकरण नागपूरपासून १०० किमी अंतरावर असलेल्या उमरेड तालुक्यातील ब्राम्हणी गावातील आहे. याचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाल्यानंतर पोलिसांनी कारवाई केल्याचे सांगण्यात येत आहे. त्वरित कारवाई करत एसपी नागपूर यांनी एसआयटी चौकशीचे आदेश दिले आहेत.

महिलांच्या अश्लील न्यूड डान्स प्रकरणी पोलिसांनी मोठी कारवाई केली आहे. उमरेड पोलीस स्टेशनअंतर्गत येणाऱ्या ब्राह्मणीतील ‘न्यूड डान्स’ प्रकरणात विशेष तपास पथकाने (एसआयटी) आणखी सात जणांना अटक केली. या प्रकरणात अटकेतील आरोपींची संख्या आता दहा झाली आहे.

पोलिसांनी यापूर्वी चंद्रशेखर ऊर्फ लाला प्रभूजी मांढरे (वय ३५), सूरज निळकंठ नागपुरे (वय २८), अनिल दमके (वय ४८), श्रीकृष्ण चाचरकर (वय ३५), बाळू नागपुरे (वय ४०), अरुण नागपुरे (वय ३७), हेमंत नागपुरे (वय ३१), नंदू रामदास मांढरे (वय २९, सर्व रा. ब्राह्मणी), बेताब बाबाजी सरोज (वय २५, रा. दिघोरी), अरशद अफजल खान (वय २६, रा. छोटा ताजबाग) अशी अटकेतील आरोपींची नावे आहेत. पोलिसांनी आधी चंद्रशेखर, सूरज व अनिलला अटक केली होती.

ब्राह्मणीमध्ये शंकरपटाच्या (बैलगाडी शर्यत) आयोजनानंतर रात्री मंडपात नागपुरातील ॲलेक्स डान्स शोच्या महिला कलाकारांचा अश्लील नृत्याचा कार्यक्रम होत होता. त्याचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरला झाला. या प्रकाराची गंभीर दखल घेत पोलीस अधीक्षक विजयकुमार मगर यांनी नागपूर विभागाच्या उपविभागीय पोलिस अधिकारी पूजा गायकवाड यांच्या नेतृत्वात एसआयटीची स्थापना केली. एसआयटीच्या पथकाने शनिवारी रात्रभर आरोपींची धरपकड करून दहा जणांना अटक केली. सर्वांना पोलिसांनी रविवारी न्यायालयात हजर केले. न्यायालयाने त्यांची एक दिवसासाठी पोलीस कोठडीत रवानगी केली.

अश्लील नृत्य करणाऱ्या नृत्यांगनाही एसआयटीच्या रडारवर असून, पथकाने तिघींना गजाआड केले आहे. एक नृत्यांगना बेलतरोडी, दुसरी मानेवाड्यातील तर तिसरी यशोधरानगरमधील रहिवासी आहे.

काय आहे प्रकरण

१७ जानेवारी रोजी ब्राह्मणी गावातील गावकऱ्यांनी बैलगाडी शर्यत कार्यक्रम आयोजित केला होता. कार्यक्रमात मोठ्या संख्येने युवक सहभागी झाले होते. कार्यक्रमाचा आस्वाद घेतल्यानंतर आयोजकांनी तरुणांना १०० रुपये प्रतिव्यक्ती नग्न नृत्य पाहण्याचे आमिष दाखवले. हा व्हिडिओ उमरेड तालुक्यातील ब्राह्मणी गावातील असल्याचे अहवालात म्हटले आहे, परंतु गावचे सरपंच रितेश अंबोन यांनी हे प्रकरण त्यांच्या गावातील नसल्याचा दावा केला आहे. ते म्हणाला की, व्हायरल झालेला व्हिडिओ आमच्या गावचा नाही. आम्ही १७ जानेवारीला बैलगाडी शर्यत कार्यक्रम आयोजित केला होता आणि त्यानंतर आम्ही लावणीचा कार्यक्रम आयोजित केला होता, ज्यामध्ये कोणतीही नग्नता नव्हती.


LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here