महाराष्ट्रातील काँग्रेसचे एवढे आमदार फुटणार?

0

मुंबई,दि.५: महाराष्ट्रातील काँग्रेसचे आमदार फुटणार असल्याचे वृत्त दैनिक लोकमतने दिले आहे. एकनाथ शिंदे यांनी बंड केल्यामुळे शिवसेनेत फूट पडली. अजित पवार यांनी बंड केल्यामुळे राष्ट्रवादी पक्षात फूट पडली. काँग्रेस पक्षातील आमदारही वेगळी भूमिका घेणार असल्याचे वृत्त आहे.

शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेसनंतर आता काँग्रेसमध्येही राजकीय भूकंप होण्याची शक्यता वर्तवली जात असून, काँग्रेसचे १५ आमदार फुटून महायुतीसोबत जातील, असा दावा केला जात आहे. येत्या महिनाभरात या घडामोडी होतील, असा दावा केला जात आहे. 

लोकमतच्या वृत्तानुसार सध्या भारत जोडो न्याय यात्रेवर असलेले राहुल गांधी हे सध्या भारत जोडो न्याय यात्रेच्या माध्यमातून देशभरात सरकार विरोधात वातावरणनिर्मिती केली जात आहे. ही यात्रा २० मार्च २०२४ रोजी मुंबईत समाप्त होणार आहे. ही भारत जोडो न्याय यात्रा महाराष्ट्रात येत असतानाच काँग्रेसला धक्का देण्याचा महायुतीचा प्रयत्न असल्याची शक्यता वर्तवली जात आहे.

महाराष्ट्रामध्ये राज्यसभेच्या ६ जागांसाठी निवडणूक होणार आहे. या निवडणुकीदरम्यानच हा भूकंप घडवून आणला जाऊ शकतो असा दावा केला जात आहे. सध्याच्या गणितानुसार राज्यसभेच्या सहा पैकी ५ जागा महायुतीच्या आणि १ जागा महाविकास आघाडीची निवडून येऊ शकते. मात्र या निवडणुकीदरम्यान, काँग्रेसचे फुटीर आमदार महायुतीसोबत आल्यास सगळी समीकरणं बिघडू शकतात. त्यामुळे या निवडणुकीवेळीच हे पक्षांतर होण्याची शक्यता आहे. मात्र काँग्रेसमधून बाहेर पडण्याच्या तयारीत असलेले हे आमदार नेमके कोण आहेत, याबाबत अधिक माहिती समोर आलेली नाही.


LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here