Election News: UP-PUNJAB सह पाच राज्यात येणार कोणाचे सरकार? निवडणुकीचा निकाल १० मार्चला लागणार

0

दि.८: Election Commission Assembly Election 2022 Dates: पाच राज्यांमध्ये आज निवडणुकांच्या तारखा जाहीर झाल्या आहेत. यासह देशातील सर्वात मोठे राज्य उत्तर प्रदेशमध्ये लोकशाहीचा सर्वात मोठा उत्सव सुरू झाला आहे. १० फेब्रुवारीपासून मतदान होणार असून १० मार्चला निकाल लागणार आहे. पंजाब, उत्तराखंड, गोवा, मणिपूरमध्येही राजकीय तापमान वाढले आहे. निवडणुकीच्या तारखा जाहीर होताच आदर्श आचारसंहिता लागू झाली आहे.

उत्तर प्रदेश, पंजाब, उत्तराखंड, गोवा आणि मणिपूर या पाच राज्यांतील विधानसभा निवडणुकीचा कार्यक्रम अखेर आज केंद्रीय निवडणूक आयोगाकडून जाहीर करण्यात येत आहे. या निवडणुकीच्या निमित्ताने आधीच या पाचही राज्यांत वातावरण तापलेलं आहे.

उत्तर प्रदेश, पंजाब, उत्तराखंड, गोवा आणि मणिपूरमध्ये आज विधानसभा निवडणुकीच्या तारखा जाहीर करण्यात आल्या आहेत. ओमिक्रॉनचा वाढता धोका, कोरोनाच्या आव्हानांच्या पार्श्वभूमीवर निवडणूक आयोगाने पाच राज्यांतील विधानसभा निवडणुकांच्या तारखा जाहीर केल्या आहेत. निवडणूक आयोगाने १० फेब्रुवारीपासून निवडणुका जाहीर केल्या आहेत. ज्यामध्ये यूपीमध्ये सात टप्प्यात, मणिपूरमध्ये दोन टप्प्यात निवडणुका होणार आहेत. याशिवाय पंजाब, गोवा आणि उत्तराखंडमध्ये एकाच टप्प्यात निवडणुका होणार आहेत.

पाच राज्यांच्या निवडणुकीबाबत

  • पंजाब, उत्तराखंड आणि गोवा येथे १४ फेब्रुवारी रोजी सर्व जागांसाठी मतदान. मणिपूरमध्ये २७ फेब्रुवारी आणि ३ मार्च रोजी होणार मतदान.
  • सात टप्प्यांत निवडणुका; पहिला टप्पा १० फेब्रुवारीपासून, १० मार्चला मतमोजणी
  • उत्तर प्रदेशात पहिल्या टप्प्यातील मतदान १० फेब्रुवारी रोजी
  • सर्व पाचही राज्यांत ७ टप्प्यांत निवडणुका होणार.
  • घरोघरी प्रचार करण्याठी केवळ पाच जणांनाच परवानगी असेल.
  • १५ जानेवारीपर्यंत जाहीर सभांनाही मनाई राहील. व्हर्च्युअल प्रचारावर भर देण्याची सूचना.
  • रोड शो, पदयात्रा, सायकल यात्रा यासाठी पूर्णपणे मनाई असेल.
  • कोविडमुळे पाचही राज्यांत मतदानाची वेळ एक तासाने वाढवली.
  • कोरोना स्थितीबाबत सर्व संबंधितांची मते विचारात घेतली आहेत.
  • सर्व निवडणूक कर्मचारी संपूर्ण लसीकरण झाले असतील याची खबरदारी घेतली गेली आहे.
  • ‘यकीन हो तो कोई भी रास्ता निकलता है, हवा की ओट लेकर चिराग भी जलता है’; निवडणूक आयुक्त चंद्रा यांची शेरोशायरी.
  • सुविधा अ‍ॅपच्या माध्यमातून दाखल करता येईल उमेदवारी अर्ज.
  • पाचही राज्यांत निवडणूक आचारसंहिता तत्काळ प्रभावाने लागू करण्यात येत आहे.
  • उमेदवारांसाठी ऑनलाइन अर्ज सादर करण्याची राहणार व्यवस्था.
  • मतदारांना पैशांचे वा अन्य आमिष दाखवण्याचा प्रयत्न झाल्यास कठोर कारवाई. सर्व यंत्रणांना केले आहे सतर्क.
  • प्रत्येक बूथवर मास्क आणि सॅनिटायझरची व्यवस्था केली जाणार.
  • know your candidate अ‍ॅप सुरू करणार. त्यावर संपूर्ण माहिती असणार.
  • राजकीय पक्षांसाठीही उमेदवाराचे गुन्हेगारी रेकॉर्ड जाहीर करणे अनिवार्य असेल.
  • गुन्हेगारी पार्श्वभूमी असलेल्या उमेदवारांना त्याबाबतचा तपशील जाहीर करावा लागणार.
  • एकूण १६२० मतदान केंद्रांवर संपूर्ण प्रक्रिया महिला कर्मचारी पार पाडणार.
  • सर्व मतदान केंद्रे तळमजल्यावर राहतील अशी व्यवस्था करण्यात येणार आहे.
  • कोविड नियमांचे काटेकोरपणे पालन केले जाणार.
  • पाच जानेवारी रोजी जाहीर केलेली मतदार यादी अंतिम असेल.
  • निवडणुकीची तयारी पूर्ण झाली आहे. पाच राज्यांत १८.३ कोटी मतदार मतदान करतील.
  • कोरोनाचे संकट असले तरी निवडणुका घेणे हे आमचे कर्तव्य: सुशील चंद्रा
  • कोरोनामुळे निवडणुका पार पाडण्याचे मोठे आव्हान.


LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here