Cough Syrup: आणखी एका भारतनिर्मित कंपनीचे कफ सिरप दूषित असल्याचा WHO चा दावा

0

नवी दिल्ली,दि.26: Cough Syrup: यापूर्वी WHO कडून भारतातील मेडेन फार्मास्युटिकल्स लिमिटेडद्वारे उत्पादित खोकला आणि सर्दीच्या औषधांबाबत अलर्ट जारी केला होता. “चार उत्पादनांपैकी प्रत्येकाच्या नमुन्यांच्या प्रयोगशाळेतील विश्लेषणाने पुष्टी केली की त्यामध्ये डायथिलीन ग्लायकोल आणि इथिलीन ग्लायकोलची अस्वीकार्य मात्रा आहे,” असे जागतिक आरोग्य संघटनेने वैद्यकीय उत्पादनाच्या अलर्टमध्ये म्हटले होते. दूषित उत्पादने आतापर्यंत फक्त गाम्बियामध्ये आढळली होती.

भारतनिर्मित कंपनीचे कफ सिरप दूषित असल्याचा WHO चा दावा | Cough Syrup

भारतात तयार होणाऱ्या आणखी एका कफ सिरपच्या  गुणवत्तेवर प्रश्नचिन्ह उपस्थित झाले आहे. वैद्यकीय इशारा जारी करून, जागतिक आरोग्य संघटनेने (WHO) भारतात तयार केलेल्या कफ सिरपला दूषित म्हटले आहे. मार्शल आयलंड आणि मायक्रोनेशियामध्ये एका भारतीय कंपनीचे कफ सिरप दूषित असल्याचे डब्ल्यूएचओने म्हटले आहे.

या वैद्यकीय अलर्टमध्ये डब्ल्यूएचओने भारतात बनवलेल्या कफ सिरपमुळे कोणतीही जीवितहानी झाली आहे की नाही हे सांगितले नाही. परंतु, डब्ल्यूएचओचे असे म्हणणे आहे की, ग्वायफेनेसिन सिरप टीजी सिरपसोबत डायथिलीन ग्लायकॉल आणि इथिलीन ग्लायकॉलचे घटक आढळले आहेत. त्याच्या वापरामुळे मानवाच्या जीवाला धोका निर्माण होऊ शकतो. हे रसायन ऑस्ट्रेलियन नियामकाने ओळखले होते. 6 एप्रिल रोजी ही माहिती डब्ल्यूएचओला देण्यात आली.

दरम्यान, डब्ल्यूएचओच्या या इशाऱ्यावर केंद्रीय आरोग्य मंत्रालयाकडून कोणतीही प्रतिक्रिया आलेली नाही. सूत्रांचे म्हणणे आहे की डब्लूएचओचा ई-मेल मिळाल्यानंतर हरयाणा आणि पंजाब सरकारला या प्रकरणात त्वरित कारवाई करण्याची शिफारस करण्यात आली होती. 

पंजाब आणि हरयाणातील कंपन्यांचे नाव समोर

डब्ल्यूएचओने माहिती दिली आहे की, पंजाबची क्यूपी फार्माकेम लिमिटेड कंपनी या कफ सिरपचे उत्पादन करते. कंपनीने इतर देशांमध्ये वितरणासाठी हरयाणा इथल्या ट्रिलियम फार्मा नावाच्या कंपनीशी करार केला आहे. डब्ल्यूएचओने सर्व सदस्य देशांना हे कफ सिरप वापरु नये, असे आवाहन केले आहे. या दोन्ही कंपन्यांनी कप सिरपच्या सुरक्षितता आणि गुणवत्ता याबाबत कोणतीही हमी दिलेली नाही, असे डब्लूएचओचे म्हणणे आहे.


LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here