सोलापूर,दि.२०: सोलापुरातील भाजपाचे वीरभद्रेश बसवंती यांचे मागच्या वर्षी कोरोनाने निधन झाले. बसवंती यांच्या घराण्याचे भाजपाशी पूर्वीपासून अर्थात जनसंघ असल्यापासून जवळचे संबंध. दिवंगत पंतप्रधान अटल बिहारी वाजपेयी हे बसवंती मंगल कार्यालयाच्या उद्घाटनाला त्यावेळी आले होते. वीरभद्रेश बसवंती हे भाजपात सक्रिय होते.
मात्र वीरभद्रेश बसवंती यांना कधी लोकप्रतिनिधी होण्याची संधी मिळाली नाही. महाविकास आघाडीने राज्यपाल नियुक्त आमदारांसाठी १२ नावे राज्यपालांना पाठवली होती. राज्यपाल यांनी त्याला मंजुरी न दिल्याने ती यादी प्रतीक्षेत राहिली. या यादीत अनेकांची नावे होती. मात्र राज्यपाल नियुक्त आमदारांच्या यादीत भाजपाचे वीरभद्रेश बसवंती यांचे नाव असल्याची बातमी दैनिक लोकमतने एका चॅनेलच्या हवाल्याने दिली.
भाजपाचे वीरभद्रेश बसवंती यांचे नाव यादीत होते हे कळल्यानंतर अनेकजण हळहळले. वीरभद्रेश बसवंती हे ह्यात असताना त्यांना कधी लोकप्रतिनिधी होण्याची संधी मिळाली नाही मात्र निधनानंतर त्यांच्या नावाची चर्चा होताना दिसत आहे. सामाजिक कार्यासाठी वीरभद्रेश बसवंती यांचे नाव ह्यात असताना चर्चेत असायचे आता आमदारांच्या यादीत नाव आल्याने पुन्हा चर्चेत आहे.