Viral Video: स्कुटीवरील तरुणीचा अपघाताचा हा व्हिडीओ ठरला चर्चेचा विषय

Viral Video: अपघाताशी संबंधी देखील आपल्याला अनेक व्हिडीओ पाहायला मिळतात, जे लोकांना सावध देखील करतात

0

मुंबई,दि.21: Viral Video: स्कुटीवरील तरुणीचा अपघाताचा हा व्हिडीओ चर्चेचा विषय ठरला आहे. सोशल मीडियावर (Social Media) अनेक प्रकारचे व्हिडीओ (Video) व्हायरल (Viral) होतात. अनेकदा काही व्हिडीओ पाहिल्यावर आश्चर्याचा धक्का बसतो. आपल्या समोर बऱ्याचदा अशा काही गोष्टी घडतात, ज्यावर विश्वास ठेवणं देखील कठीण जातं.

तर काही गोष्टी या धक्कादायक असतात. सध्या असाच एक व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. जो पाहून आधी तर तुम्हाला नक्की काय घडलं हे कळणारच नाही, ज्यामुळे तुम्ही दोन वेळा तरी हा व्हिडीओ नक्की पाहावा लागेल.

सोशल मीडियावर (Social Media) दररोज काहीतरी व्हायरल होत असते. सोशल मीडिया हे मनोरंजनाचं प्लॅटफॉर्म आहे. ते एकदा का तुम्ही उघडलात तर तुम्हाला असंख्य व्हिडीओ तेथे पाहायला मिळतील. त्यामुळे हे व्हिडीओ पाहाण्यात लोकांचा वेळ कसा निघून जातो, हे आपलं आपल्यालाच कळणार नाही. त्यात येथे अपघाताशी संबंधी देखील आपल्याला अनेक व्हिडीओ पाहायला मिळतात, जे लोकांना सावध देखील करतात.

या व्हायरल झालेल्या व्हिडीओमध्ये अपघात होताच स्कुटीवरील तरुणी अचानक गायब होते. ज्यामुळेच हा व्हिडीओ सर्वाधीक चर्चेचा विषय ठरला आहे. पण आता जर तुम्ही विचार करत असाल की, त्याचा संबंध भूताशी आहे, तर तसं नाही.

खरंतर ही मुलगी स्कूटी चालवताना कारला अशा प्रकारे धडकते की ती थेट मोठ्या नाल्यात जाऊन पडते.

या व्हायरल व्हिडीओमध्ये आधी रस्त्याच्या मधोमध ही तरुणी स्कुटीवरुन खाली पडते आणि मग ती रस्त्यावरुन सरकून थेट रस्त्याच्या कडेला जाते आणि तिथे असलेल्या नाल्यामध्ये पडते, ज्यामुळे ही तरुणी तेथून गायब झाल्यासारखीच वाटते. व्हिडीओमध्ये पुढे काही लोक या नाल्याच्या आजूबाजूला जमल्याचे दिसत आहे.

हे लोक त्या तरुणीला नाल्या बाहेर काढण्यासाठी मदत करत आहेत. ज्यानंतर ती तरुणी सुखरुप हा बाहेर देखील पडली आहे. हा व्हिडीओ परदेशातील असल्याचं लक्षात येत आहे. ज्याला सोशल मीडिया अकाउंटवर शेअर करण्यात आलं आहे.


LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here