Amruta Pawar: शोभायात्रेत मराठी अभिनेत्रीने चालवला दांडपट्टा, व्हिडीओ चर्चेत

0

कोल्हापूर,दि.२२: Amruta Pawar Video: मराठी नववर्ष आणि गुढीपाडवा (Gudi Padwa) राज्यभर साजरा होत आहे. आज गुढीपाडव्यानिमित्त सर्वत्र चैतन्याचं आणि उत्साहाचं वातावरण आहे. सर्वजण आपल्या कुटुंबीयांबरोबर गुढी उभारत, त्याचबरोबर शोभायात्रेत सहभागी होत गुढीपाडवा साजरा करत आहेत. अनेक कलाकार देखील शोभायात्रेत दरवर्षी सहभागी होत असतात. तर आता कोल्हापूर येथील शोभायात्रेत अभिनेत्री अमृता पवार (Amruta Pawar) हिने दांडपट्टा चालवला.

अमृता पवार छोट्या पडद्यावरील लोकप्रिय अभिनेत्री | Amruta Pawar

अमृता पवार ही छोट्या पडद्यावरील लोकप्रिय अभिनेत्री. ती सध्या ‘आशीर्वाद तुझा एकविरा आई’ या मालिकेतून प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे. या मालिकेतील तिच्या कामाचं खूप कौतुक होत आहे. अशातच ती शोभायात्रेतील तिच्या व्हिडीओमुळे खूप चर्चेत आली आहे.

आज सकाळी अमृता गुढीपाडव्यानिमित्त कोल्हापूर येथील एका शोभायात्रेत सहभागी झाली होती. लाल रंगाची सुंदर साडी नेसून आणि केसात गजरा माळून ती शोभायात्रेत सहभागी झाली. तिने तिथे नुसतीच हजेरी लावली नाही तर तिची कोणालाही माहीत नसलेली तिची बाजू या शोभात्रेतून समोर आली. या शोभायात्रेत तिने दाण दांडपट्ट्याचं प्रात्यक्षिक केलं. तिला दांडपट्टा चालवताना पाहण्यासाठी सर्वांनी गर्दी केली होती.

आता तिचा हा व्हिडीओ खूप चर्चेत आला असून यावर नेटकऱ्यांनी प्रतिक्रिया देण्यास सुरुवात केली आहे. तिचा हा व्हिडीओ पाहून सर्वजण आवाक् झालेले पाहायला मिळाले. या व्हिडिओवर कमेंट करत सर्वजण आता तिचं कौतुक करत आहेत.


LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here