रामनवमी पूजेत व्यत्यय JNU मध्ये हिंसाचार, दोन विद्यार्थी संघटनेचे कार्यकर्ते भिडले

0

नवी दिल्ली,दि.११: रामनवमी पूजेत व्यत्यय आणल्याने JNU मध्ये हिंसाचार झाला आहे. दिल्लीतील जवाहरलाल नेहरू विद्यापीठातील वसतीगृहात रविवारी विद्यार्थ्यांचे दोन गट आमने-सामने आल्याने पुन्हा एकदा हिंसा झाली आहे. या घटनेत काही विद्यार्थी जखमी झाले असून अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेच्या (ABVP) कार्यकर्त्यांनी मांसाहाराला विरोध करत विद्यार्थ्यांवर हल्ला केला, असा आरोप जवाहरलाल नेहरू विद्यापीठ छात्र संघाने (JNUSU) केला आहे. तर दुसरीकडे अभाविपच्या कार्यकर्त्यांनी हा आरोप फेटाळून लावत जेएनयूएसयूमधील काही विद्यार्थ्यांनी रामनवमीनिमित्त आयोजित कार्यक्रमाला विरोध केल्याचा दावा केला आहे.

जेएनयूमध्ये झालेल्या गोंधळासंदर्भात विश्व हिंदू परिषदेचे प्रवक्ते विनोद बन्सल यांनी वक्तव्य जारी केलेलं आहे. अतिरेक्यांच्या माध्यमातून अपप्राचार केला जातोय असं या वक्तव्यामध्ये म्हटलं आहे. प्रत्येकाला जेवणाचं स्वातंत्र्य आहे असं सांगताना वाद रामनवमी साजरी करण्यावरुन झाल्याचं ते म्हणाले आहेत. काही विद्यार्थी रामनवमीनिमित्त पूजा करत असतानाच डाव्या संघटनेच्या विद्यार्थ्यांनी आंदोलन सुरु केलं. त्यामुळे झटापट झाली असून मारहाण झालेली नसल्याचा दावा बन्सल यांनी केलाय.

अभविपच्या विद्यार्थ्यांनी केलेल्या दाव्यानुसार रामनवमीच्या पूजेचं आयोजन केलं असता त्या ठिकाणी डव्या संघटनांच्या विद्यार्थ्यांनी येऊन आंदोलन केलं. याच रागामधून अभाविप आणि डाव्या संघटनेच्या विद्यार्थ्यांमध्ये वाद झाला आणि मारहाण करण्यात आली. दोन्ही गटांमधील काही लोकांना किरकोळ मार लागलाय.

पोलीस उपायुक्त (दक्षिण पश्चिम) मनोज सी. यांनी या घटनेबाबत माहिती दिली आहे. जेएनयूमध्ये झालेल्या राड्यात १५ विद्यार्थी जखमी झाल्याची माहिती असून या विद्यार्थ्यांना उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे. या घटनेचा तपशील लवकरच दिला जाईल, असंही मनोज सी. यांनी म्हटलं आहे.

पोलीस उपायुक्त (दक्षिण पश्चिम) मनोज सी. यांनी या घटनेबाबत माहिती दिली आहे. जेएनयूमध्ये झालेल्या राड्यात १५ विद्यार्थी जखमी झाल्याची माहिती असून या विद्यार्थ्यांना उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे. या घटनेचा तपशील लवकरच दिला जाईल, असंही मनोज सी. यांनी म्हटलं आहे.


LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here