Vinod Kambli Arrested: माजी क्रिकेटपटू विनोद कांबळीला पोलिसांनी केली अटक

0

Vinod Kambli Arrested: टीम इंडियाचा माजी क्रिकेटपटू विनोद कांबळी (Vinod Kambli) याला मुंबई पोलिसांनी रविवारी अटक (Vinod Kambli Arrested) केली. विनोद कांबळी दारूच्या नशेत गाडी चालवत होता, त्याच्याविरोधात एका व्यक्तीने तक्रार दाखल केली होती.

टीम इंडियाचा माजी क्रिकेटपटू विनोद कांबळी याला मुंबई पोलिसांनी रविवारी अटक केली. मुंबईतील वांद्रे येथे विनोद कांबळी दारूच्या नशेत गाडी चालवत असताना त्याची गाडी सोसायटीच्या गेटवर धडकली, त्यानंतर पोलिसांनी ही कारवाई केली. मात्र, नंतर विनोद कांबळीला जामीन मिळाला.

मिळालेल्या माहितीनुसार, 50 वर्षीय विनोद कांबळी दारूच्या नशेत गाडी चालवत होता. मद्यधुंद अवस्थेत त्याने गेटला धडक दिल्याचा आरोप करत एका व्यक्तीने त्याच्याविरोधात तक्रार दाखल केली होती. यानंतर वांद्रे पोलिसांनी विनोद कांबळीला अटक केली होती.

पीटीआय या वृत्तसंस्थेने दिलेल्या माहितीनुसार, विनोद कांबळी यांनी त्यांची कार सोसायटीच्या गेटवरही धडकली होती.

विनोद कांबळी वांद्रे येथे ज्या इमारतीत राहतो त्याच इमारतीच्या गेटवर त्याची गाडी आदळली. यावरून विनोदचा वॉचमन आणि तेथील रहिवाशांसोबत वाद झाला. हा किरकोळ वाद इतक्या टोकाला गेला की इमारतीमधील रहिवाशांनी त्याच्या विरोधात पोलिसात तक्रार केली. त्यानंतर पोलिसांनी त्याला अटक केली. त्याच्याविरुद्ध वेगाने गाडी चालवणे, लोकांचा जीव धोक्यात घालणे त्याच बरोबर इमारतीच्या संपत्तीला धोका पोहोचवणे आदी गुन्हे दाखल केले आहेत.

याआधीही विनोद कांबळी अनेक वादांत अडकला आहे. 2015 मध्ये त्याच्यासह पत्नीवर काम करणाऱ्या बाईने गंभीर आरोप केले होते. 2015 मध्ये विनोद व पत्नी एंड्रिया हेव्हिट यांच्याविरुद्ध FIR दाखल झाला होता. काम करणाऱ्या बाईने कामाचे पैसे मागितले म्हणून तिला तीन दिवस खोलीत बंद केल्याचा आरोप दोघांवर होता. पण, या दोघांनी तिच्यावर ड्रग्स घेत असल्याचा आरोप केला. 


LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here