सोलापूर महापालिका, विनायक कोंड्याल होणार महापौर

0
विनायक कोंड्याल

सोलापूर,दि.२: सोलापूर महानगरपालिकेचे विनायक कोंड्याल हे महापौर होणार आहेत. तर सोलापूर महानगरपालिका भाजपा गटनेता म्हणून नरेंद्र काळे यांची निवड करण्यात आली होती. महापालिका निवडणुकीत भाजपचे ८७ उमेदवार विजयी झाले आहेत. महापालिकेच्या १०२ जागांवर भाजपने उमेदवार दिले होते. या निवडणुकीत भाजपला सर्वाधिक जागा मिळाल्या आहेत.

सोलापूर महापालिका निवडणूक निकाल जाहीर झाल्यानंतर कोण होणार महापौर? याकडे सर्वांचे लक्ष लागले होते. विनायक कोंड्याल हे आमदार देवेंद्र कोठे यांचे भाऊजी आहेत. महापौर पदाची निवडणूक ६ फेब्रुवारीला घेतली जाणार आहे. महापौर पदासाठी डॅा. किरण देशमुख, अनंत जाधव यांची नावे चर्चेत होती.

डॅा. किरण देशमुख हे आमदार विजयकुमार देशमुख यांचे पुत्र आहेत तर अनंत जाधव हे आमदार देशमुख गटातील नगरसेवक आहेत. सोलापूर महानगरपालिकेवर आमदार देवेंद्र कोठे यांचीच सत्ता चालणार हे आता स्पष्ट झाले आहे.


LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here