Vijay Darda: कोळसा घोटाळा प्रकरणी राज्यसभेचे माजी खासदार विजय दर्डा दोषी

0

नवी दिल्ली,दि.13: Vijay Darda: दिल्लीच्या विशेष न्यायालयाने छत्तीसगडमधील कोळसा खाण वाटपातील अनियमिततेबाबत आपला निकाल दिला आहे. याप्रकरणी न्यायालयाने सर्व आरोपींना दोषी ठरवले आहे. यामध्ये माजी राज्यसभा खासदार विजय दर्डा (Vijay Darda), विजय दर्डा यांचे पुत्र देवेंद्र दर्डा, कोळसा विभागाचे माजी सचिव एचसी गुप्ता आणि दोन वरिष्ठ अधिकारी के. एस. क्रोफा आणि के. सी. सामरिया, जेएलडी यवतमाळ एनर्जी प्रायव्हेट लिमिटेड आणि त्यांचे संचालक मनोज कुमार जयस्वाल इत्यादींचा समावेश आहे. (Vijay Darda News)

माजी खासदार विजय दर्डा दोषी | Vijay Darda

गुरुवारी या प्रकरणाच्या सुनावणीदरम्यान विशेष न्यायाधीश संजय बन्सल यांनी या सर्व लोकांना दोषी ठरवले. न्यायालयाने सर्व आरोपींना भारतीय दंड संहितेच्या कलम 120 (ब) – गुन्हेगारीस्वरुपाचं षडयंत्र, कलम 420 फसवणूक या कलमांखाली दोषी ठरवलं. असं असलं तरी न्यायालयाने आरोपींना कलम 409 सरकारी कर्मचाऱ्यांकडून होणारा गुन्हेगारी स्वरुपाचा विश्वासघात या आरोपातून मुक्त केलं.

दरम्यान, सीबीआयने न्यायालयाने सांगितलं होतं की, जेएलडी यवतमाळ एनर्जी लिमिटेडला छत्तीसगडमधील पूर्व फतेहपूर कोळसा खाणी मिळाल्या होत्या. हा एका षडयंत्राचा भाग होता. यात पात्रतेच्या निकषांचा चुकीचा अर्थ काढण्यात आला. तसेच अर्जांमध्ये चुकीचे दावे करण्यात आले. सीबीआयने दिलेल्या माहितीनुसार, आतापर्यंत आरोप सिद्ध झालेलं हे 13 वं प्रकरण आहे.


LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here