Video: भाजपाचे चंद्रकांत पाटील यांच्या स्वागताला लावले ‘राष्ट्रवादी पुन्हा…’ गाणे

0

पुणे,दि.28: भाजपाचे चंद्रकांत पाटील (Chandrakant Patil) यांच्या कार्यक्रमात राष्ट्रवादी (NCP) पक्षाचे ‘राष्ट्रवादी पुन्हा –‘ हे गाणे वाजविण्यात आले. ‘राष्ट्रवादी पुन्हा’ या गाण्याने चंद्रकांत पाटील यांचे स्वागत करण्यात आले. भारतीय जनता पक्षाचे वरिष्ठ नेते आणि पुण्याचे पालकमंत्री चंद्रकांत पाटील (Chandrakant Patil) यांच्या कार्यक्रमात चक्क राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे (NCP) प्रचाराचं गाणं वाजविण्यात आले. चंद्रकांतदादा कार्यक्रमाला येताच राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रचार गीत असलेले ‘राष्ट्रवादी पुन्हा…’ वाजविल्याने पुणे शहरात त्याची एकच चर्चा सुरू झाली आहे.

पुण्याचे पालकमंत्री चंद्रकांत पाटील हे (Pune Guardian Minister Chandrakant Patil) पुण्यात दिवाळी निमित आयोजित कार्यक्रमासाठी आले होते. भाजपकडून त्यांच्या स्वागताची जोरदार तयारी करण्यात आली होती. मात्र त्याच वेळी चंद्रकांत पाटील येताच मोठ्या आवाजात राष्ट्रवादी पुन्हा हे गाणे वाजवण्यात (NCP song played of Chandrakant Patil welcome) आले. पुण्यातल्या रास्ता पेठ भागात ते आले होते. ते कार्यक्रमाच्या स्थळी पोहोचताच तिथे उपस्थित असलेल्या डीजेने राष्ट्रवादी काँग्रेसचं प्रचार गीत लावले. यानंतर एकच गोंधळ उडाला. त्यानंतर पोलिसांनी या डीजेला ताब्यात घेतले.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, विनापरवाना साउंड सिस्टीम उभारण्यात आली होती, त्यामुळे संबंधितांवर पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे. रास्ता पेठेतील एका कार्यक्रमावेळी चंद्रकांत पाटील आल्यानंतर उपस्थितीत ‘डीजे’वर अचानक राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे प्रचार गीत लागले आहे, त्यामुळे उपस्थितांमध्ये एकच खसखस पिकली.

निवडणूक प्रचारकाळात राष्ट्रवादीकडून वाजविण्यात येणारे ‘राष्ट्रवादी पुन्हा….’ हे गीत प्रचंड गाजले आहे. ग्रामीण भागात अनेकदा परण्याच्या कार्यक्रमातही ‘राष्ट्रवादी पुन्हा…’ हे गाणं वाजविण्यात येतं. पण, कट्टर विरोधक असलेल्या भाजपच्या कार्यक्रमात राष्ट्रवादी काँग्रेसचं प्रचारगीत वाजविण्यात आल्याने खळबळ उडाली आहे. अचानकपणे हे गाणं वाजल्याने अनेकांकडून सखेद आश्चर्यही व्यक्त करण्यात येत आहे.

दरम्यान, पुणे पोलिसांनी डीजे चालकाला ताब्यात घेतले आहे. साऊंउ सिस्टीम विनापरवाना लावण्यात आली होती, असे कारण देत डीजे चालकावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.


LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here