Umesh Patil: राजन पाटील यांनी माझ्या विरोधात तालुक्यातील कुठल्याही मतदारसंघात उभं राहावे: उमेश पाटील

Umesh Patil: यात जर मी पराभूत झालो तर तालुक्याचंच काय,जिल्ह्याचं राजकारण सोडेन

0

मोहोळ,दि.२१: Umesh Patil challenges Rajan Patil: मोहोळ तालुक्याचे राष्ट्रवादी काँग्रेसचे माजी आमदार राजन पाटील (Rajan Patil) आणि प्रदेश प्रवक्ते उमेश पाटील (Umesh Patil) यांच्यातील मतभेद जिल्हाभर प्रसिद्ध आहेत. उमेश पाटील यांनी रविवारी घेतल्या पत्रकार परिषदेत कार्यकर्त्यांपेक्षा तालुक्यातील कोणत्याही मतदारसंघात स्वतः राजन पाटील यांनी उभे राहावे, यात जर मी पराभूत झालो तर तालुक्याचंच काय, जिल्ह्याचं राजकारण सोडेन असे विधान केले आहे.

मी राष्ट्रवादी काँग्रेसच्या युवकांचा प्रदेशाध्यक्ष होतो. प्रदेश प्रवक्ता होतो आणि अश्या व्यक्तीला जर हे ओळखत नसतील. ते मला काय चॅलेंज देतात मी त्यांना दोन वर्षांपूर्वीच चॅलेंज दिले आहे. त्याचं उत्तर ते आत्ता देतात आणि म्हणतात की मी माझा सामान्य कार्यकर्ता उमेश पाटलांच्या विरोधात उभा करीन.

गरिबांची घरे जाळण्याऐवजी राजन पाटील यांनी स्वतः माझ्या विरोधात तालुक्यातील कुठल्याही मतदारसंघात उभं राहावे. यात जर मी पराभूत झालो तर तालुक्यचंच काय, जिल्ह्याचं राजकारण सोडेन असा हल्लाबोल राष्ट्रवादीचे प्रदेश प्रवक्ते उमेश पाटील यांनी केला.

रविवारी मोहोळ येथे आयोजित पत्रकार परिषदेत उमेश पाटील बोलत होते. पुढे ते म्हणाले की ते स्वतः सांगतात की माझे वडील त्यांच्या वडिलांचे कार्यकर्ते होते. आणि असे असताना ते त्या कार्यकर्त्यांच्या मुलाला ओळखत नसतील आणि स्वतःला तालुक्याचे नेते समजत असतील तर आत्ता जे त्यांचे कार्यकर्ते म्हणून काम करीत आहेत. त्यांनी सुद्धा विचार करणे आवश्यक आहे. असे सांगत असंस्कारी चारित्र्यहीन व मस्तीखोर लोकांच्या विरोधात माझी लढाई आहे. ती मी लोकशाही मार्गेने लढणार आहे. लोकशाहीत फक्त मतदार हाच राजा असतो. इथं कोणीही ताम्रपट घेऊन आलेले नसते. जनतेला गृहीत धरून हे राजकारण करीत आहेत. हे तालुक्यातील जनतेने आत्ता पूर्णपणे ओळखले आहे.

याचा प्रत्यय कालच्या भीमा सहकारी साखर कारखान्याच्या निवडणुकीत आला आहे. येणाऱ्या सर्व निवडणूका आम्ही सर्वजण समविचारी एकत्रीत येऊन लढणार आहोत, असेही यावेळी उमेश पाटील म्हणाले. यावेळी रमेश बारसकर, माजी उपसभापती मानाजी माने, पद्माकर देशमुख, विक्की देशमुख, राहुल क्षीरसागर अशोक क्षीरसागर, संजय विभूते, सचिन चव्हाण, प्रसन्न पाटील, बाळासाहेब मोटे, शिक्षक संघटनेचे शामराव जवंजाळ, वाफळेचे आप्पासाहेब पाटील, सागर जाधव, अजिंक्य क्षीरसागर, सागर जाधव आदी उपस्थित होते.


LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here