Ulhasnagar: महापालिकेने केली चांदनी डान्सबारवर कारवाई, ठोकलं टाळं

0

उल्हासनगर,दि.३१: चांदनी डान्सबारवर (Chandni Dance Bar) उल्हासनगर महापालिकेने (Ulhasnagar Municipal Corporation) कारवाई केली आहे. हा डान्सबार शासनाने घालून दिलेल्या नियमांचे उल्लंघन करत सुरू होता. यापूर्वी चांदनी डान्सबारवर पोलीस व महापालिकेकडून ८० वेळा कारवाई करण्यात आली आहे. यावेळी उल्हासनगर महापालिकेने कडून चांदनी डान्सबार थेट सील करण्यात आला आहे. मटाने या संदर्भात वृत्त दिले आहे. कोरानाच्या काळातही नियमांचे उल्लंघन करत हा डान्स बार सुरू होता. (Ulhasnagar Municipal Corporation took action against Chandni Dance Bar)

उल्हासनगरच्या १७ सेक्शन परिसरात चांदनी नावाचा डान्सबार अनेक वर्षांपासून सुरू होता. कोरोनाच्या (Covid -19) काळातही सरकारी नियम न पाळता बिनधास्तपणे या बारमध्ये छमछम सुरु होती. या बारमध्ये आजवर अनेकदा स्थानिक पोलिसांनी आणि गुन्हे शाखेनं धाड टाकली होती. याठिकाणी अश्लील नृत्य चालत असल्याचा भांडाफोड केला होता. इतकंच नव्हे, तर आजवर या डान्सबारवर तब्बल ८० वेळा पोलीस आणि महापालिकेकडून कारवाई करण्यात आली होती.

तरीही या बारच्या लीला काही कमी होत नव्हत्या. त्यामुळे मध्यवर्ती पोलिसांनी थेट हा बार सील करण्याचा गोपनीय अहवाल उल्हासनगर महापालिकेच्या आयुक्तांना ६ डिसेंबर रोजी पाठवला होता. त्याची दखल घेत उल्हासनगर महापालिकेच्या पथकानं ऐन थर्टी फर्स्टच्या पूर्वसंध्येलाच या बारला सील ठोकलं आहे. त्यामुळे उल्हासनगरच्या डान्सबार लॉबीत मोठी खळबळ उडाली आहे. उल्हासनगर शहरात आजच्या घडीला १२ ते १५ डान्सबार सुरू आहेत. त्यातले अर्ध्यापेक्षा जास्त डान्सबार हे एकट्या मध्यवर्ती पोलीस ठाण्याच्या हद्दीत आहेत. तरी शेवटी चांदनी बारवरील कारवाई का केली, याविषयी अनेक प्रश्न उपस्थित केले जात आहेत.


LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here