शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी सांगितले शिवसेनेत कुणी फूट पाडली

0

मुंबई,दि.19: शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) मुंबईतील उत्तर भारतीय महासंघाच्या पदाधिकाऱ्यांशी संवाद साधला. यावेळी उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांनी भाजपावर टीका केली. संघर्षाला ठाकरे घाबरत नाही. हे दिवसही जातील, असा विश्वास उद्धव ठाकरेंनी उपस्थितांना दिला.

शिवसेनेच्या आमदारांसोबत आता खासदारही मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या गटात सहभागी झाले आहेत. मुख्यमंत्री शिंदे दिल्ली दौऱ्यावर असताना या खासदारांनी त्यांची भेट घेतली. पक्षाच्या एकूण 19 खासदारांपैकी 12 खासदारांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे पुष्पगुच्छ देऊन स्वागत केले. त्यामुळे आमदारांपाठोपाठ आता शिवसेनेला खासदारांनीही धक्का दिला आहे. 

एकीकडे पक्षातील खासदार, आमदार, नगरसेवक शिंदे गटात सहभागी होत असताना दूसरीकडे शिवसेना पक्षप्रमुख आणि माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे दररोज शिवसेना भवनात शिवसेनेच्या पदाधिकाऱ्यांशी संवाद साधत आहेत. आज उद्धव ठाकरे यांनी मुंबईतील उत्तर भारतीय महासंघाच्या पदाधिकाऱ्यांशी संवाद साधला. यावेळी त्यांनी भाजपावर निशाणा साधला. 

उद्धव ठाकरे म्हणाले की, माझ्या भात्यातील कितीही बाण घेऊन पळा, पण धनुष्य हे माझ्याकडे आहे, लक्षात ठेवा. शिवसेनेत बंडखोरांनी फूट पाडली नाही तर ती भाजपाने पाडली आहे. भाजपाच शिवसेनेला संपवत आहे, असा आरोप उद्धव ठाकरे यांनी केला. तसेच सध्या शिवसेनाचा कठीण काळ सुरु आहे. मात्र संघर्षाला ठाकरे घाबरत नाही. हे दिवसही जातील, असा विश्वास उद्धव ठाकरेंनी उपस्थितांना दिला. मैदानात उतरु पुन्हा पक्ष नव्याने बांधू, शिवसेना पुन्हा उभी करु, असंही उद्धव ठाकरे म्हणाले.


LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here