Uddhav Thackeray Nagpur: ‘देवेंद्र फडणवीस नागपूरला लागलेले कलंक’ उद्धव ठाकरे

देवेंद्र फडणवीसांची ‘ती’ ऑडिओ क्लिप ऐकवली

0

नागपूर,दि.१०: Uddhav Thackeray Nagpur: माजी मुख्यमंत्री उध्दव ठाकरे (Uddhav Thackeray) यांनी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांच्यावर जोरदार हल्लाबोल केला. उद्धव ठाकरे दोन दिवसीय विदर्भ दौऱ्यावर आहेत. आज ( १० जुलै ) उद्धव ठाकरे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा बालेकिल्ला नागपूर येथे आहेत. यावेळी उद्धव ठाकरे यांनी देवेंद्र फडणवीस यांची एक क्लिप ऐकवत हल्लाबोल केला आहे. देवेंद्र फडणवीस नागपूरला लागलेले कलंक आहेत, अशी टीकाही उद्धव ठाकरे यांनी केली आहे.

काय म्हणाले उद्धव ठाकरे? | Uddhav Thackeray Nagpur

उद्धव ठाकरे म्हणाले, “देवेंद्र फडणवीसांची परिस्थिती सहनही होत नाही आणि सांगताही येत नाही, अशी विचित्र झाली आहे. बोलो तैसा चाले, त्याची वंदावी पावले. अलीकडे देवेंद्र फडणवीस बोलले, ‘मी पुन्हा येईन, असं बोललो होतो. पण, दोघांना घेऊन आलो.’ ते दोघेजण कोण आहेत?”

उद्धव ठाकरे यांनी यावेळी एक ऑडिओ क्लिप ऐकवली. त्यात देवेंद्र फडणवीस म्हणतात की, ‘राष्ट्रवादी काँग्रेसशी युती शक्य नाही. आपला धर्म नाही, शाश्वत नाही. एकवेळ सत्तेशिवाय राहू. एकवेळी अविवाहीत राहणं पसंत करेन. पण, राष्ट्रवादीशी युती करणार नाही.’

देवेंद्र फडणवीस हे नागपुराला लागलेले कलंक | Uddhav Thackeray Nagpur

“देवेंद्र फडणवीस हे नागपुराला लागलेले कलंक आहेत. आता सांगत आहेत, उद्धव ठाकरेंनी पाठित खंजीर खुपसला म्हणून आम्ही यांच्याबरोबर गेलो. पहिलं उद्धव ठाकरेच्या पाठित खंजीर कुणी खुपसला? २०१४ ते २०१९ तुमच्याबरोबर सत्तेत होतो. २०१४ साली शिवसेनेनं नाहीतर, तुम्ही युती तोडली. तेव्हा मी काँग्रेसबरोबर गेलो नव्हतो. मी तिथेच होतो आणि तिथेच आहे. वार करणारी तुमची अवलाद आहे,” असा घणाघात उद्धव ठाकरे यांनी भाजपावर केला आहे.


LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here