मुंबई,दि.22: उद्धव ठाकरे आणि प्रकाश आंबेडकर यांचा औरंगजेबासह फोटो असलेले बॅनर्स लागल्यामुळे खळबळ उडाली आहे. वंचित बहुजन आघाडीचे नेते प्रकाश आंबेडकर (Prakash Ambedkar) यांनी औरंगाबादच्या खुलताबाद येथे जाऊन औरंजेबाच्या कबरीवर माथा टेकला होता. यामुळे उद्धव ठाकरे यांची राजकीय कोंडी होण्याची शक्यता व्यक्त होत आहे. या प्रकरणावरून सत्ताधाऱ्यांनी आंबेडकरांवर निशाणा साधला होता. आंबेडकर सध्या ठाकरे गटाचे मित्रपक्ष आहेत. त्यामुळे आंबेडकरांनी केलेल्या या कृतीवर ठाकरेंनी प्रतिक्रिया द्यावी, अशी मागणी सत्ताधाऱ्यांकडून करण्यात येत होती.
हेही वाचा अजित पवारांच्या वक्तव्यावर सुप्रिया सुळे यांची सूचक प्रतिक्रिया
उद्धव ठाकरे आणि प्रकाश आंबेडकर यांचा…
त्यामुळे आंबेडकरांनी केलेल्या या कृतीवर ठाकरेंनी प्रतिक्रिया द्यावी, अशी मागणी सत्ताधाऱ्यांकडून करण्यात येत होती. परंतु, ठाकरेंनी सत्ताधाऱ्यांनाच जाब विचारात “जिन्नाहच्या कबरीवर आडवाणींनी डोकं का टेकलं होतं” असा प्रतिप्रश्न विचारला होता. यावरून वाद आता शमत नाही तोवर मुंबईतील माहिम परिसरात उद्धव ठाकरे, प्रकाश आंबेडकर यांचा औरंगजेबासोबत फोटो छापलेले बॅनर लावण्यात आले आहे. यामुळे परिसरात तणावपूर्ण शांतता आहे.
हे बॅनर्स कुणी लावले? असा सवाल या निमित्ताने केला जात आहे. माहीम परिसरात उद्धव ठाकरे, प्रकाश आंबेडकर आणि औरंगजेबाचा फोटो असलेले बॅनर्स लागले आहेत. मध्यरात्री अज्ञात इसमाने हे बॅनर्स लावले आहेत. त्यामुळे एकच खळबळ उडाली आहे. सकाळी हे बॅनर्स पाहिल्यानंतर त्याची एकच चर्चा सुरू झाली. स्थानिक शिवसैनिकांनी तात्काळ हे बॅनर्स हटवले. याप्रकरणी पोलिसात तक्रार दाखल करण्यात आलेली नाही. कुणी तरी हा खोडसाळपणा केल्याचं सांगितलं जात आहे. तसेच अशा प्रकारामुळे कायदा सुव्यवस्थेचा प्रश्नही निर्माण होऊ शकतो असं सांगितलं जात आहे.
पोलीस एफआयआर दाखल करणार
या बॅनर्सची शिवसैनिकांनी किंवा इतर कुणची पोलिसात तक्रार दाखल केली नसली तरी पोलीस स्वत:हून अज्ञात व्यक्ती विरोधात एफआयआर दाखल करणार आहेत. तशी माहिती डीसीपींनी दिली आहे. या बॅनर्समुळे पोलीस यंत्रणा सतर्क झाली आहे. कायदा आणि सुव्यवस्था बिघडवण्याचा प्रयत्न केल्यास कठोर कारवाई करण्याचा इशाराही डीसीपीने दिला आहे.
बॅनरवर नेमकं काय?
या बॅनर्सवरील भाषा अत्यंत आक्षेपहार्य आहे. औरंग्याच्या थडग्यावर प्रकाश घालतोय मुजरे, मुघली उदात्तीकरणासाठी सोबतीला उद्धवचे हुजरे… शिवरायांची जनता, असं या बॅनर्सवर लिहिलं आहे. तसेच #uddhavthackerayforaurangazeb असा हॅशटॅग या बॅनर्सवर वापरण्यात आला आहे. तसेच या बॅनर्सवर माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, प्रकाश आंबेडकर आणि औरंगजेबाचा फोटो लावण्यात आला आहे.