अखेर लैंगिक अत्याचार प्रकरणातील आरोपी तुषार आपटे…

0

बदलापूर,दि.१०: बदलापूर नगरपरिषदेत स्वीकृत नगरसेवक म्हणून भाजपाने लैंगिक अत्याचार प्रकरणातील आरोपी तुषार आपटेची नियुक्ती केली होती. मनसे महामोर्चा काढणार असल्याचे मनसे नेते अविनाश जाधव यांनी सांगितले होते. अखेर लैंगिक अत्याचार प्रकरणातील आरोपी तुषार आपटेनी नगरसेवकपदाचा राजीनामा दिला आहे. 

काय आहे प्रकरण?

भाजपने कुळगाव–बदलापूर नगरपरिषदेत बदलापूर येथील वादग्रस्त शैक्षणिक संस्थेचे सचिव तुषार आपटे यांना ‘स्वीकृत नगरसेवक’ म्हणून संधी दिली होती. बदलापूरमधील दोन चिमुकल्यांवर झालेल्या लैंगिक अत्याचार प्रकरणात सहआरोपी असलेले एका नामांकित शाळेचे सचिव तुषार आपटे यांना भाजपने आज थेट स्वीकृत नगरसेवक केले होते. 

कथित सहआरोपी आपटे हे न्यायालयीन जामिनावर बाहेर आहेत. बदलापूरच्या नामांकित शाळेत ऑगस्ट २०२४ मध्ये दोन चिमुरडय़ांवर झालेल्या अत्याचार प्रकरणाचे पडसाद अवघ्या देशात उमटले होते. या प्रकरणातील मुख्य आरोप अक्षय शिंदे याचा पोलिसांनी एन्काऊंटर केला होता.

मोठ्या प्रमाणावर भाजपावर टीका करण्यात येत होती. आपटेच्या विरोधात मनसेने महामोर्चा काढायची तयारी केली होती. बाललैंगिक अत्याचार प्रकरणातील आरोपीला नगरसेवक केल्याने भाजपवर सर्व बाजूंनी टीका होत आहे. अखेर स्वीकृत नगरसेवक तुषार आपटे यांनी आपल्या पदाचा राजीनामा दिला आहे. 

मनसेने दिला होता इशारा

“ज्या व्यक्तीवर पोक्सोसारखे गंभीर गुन्हे आहेत, त्याला सत्तेच्या खुर्चीवर बसवणे हा बदलापूरकरांचा अपमान आहे,” अशी तोफ मनसेने डागली आहे. तुषार आपटे हे केवळ आरोपी नाहीत, तर त्यांनी अत्याचाराची माहिती दडपण्याचा प्रयत्न केला होता. अशा कलंकित व्यक्तीचे नगरसेवक पद तात्काळ रद्द करावे, ही मनसेची प्रमुख मागणी आहे. जर भाजपने ही नियुक्ती मागे घेतली नाही, तर मनसे स्टाईलने तीव्र आंदोलन करण्याचा इशारा अविनाश जाधव यांनी दिला होता.


LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here