अमेरिका-इराण संघर्ष: दोन भाकितं खरी ठरल्यानंतर प्रा. जियांग यांच्या तिसऱ्या दाव्याने खळबळ

0

सोलापूर,दि.६: पश्चिम आशियातील तणाव आता एका निर्णायक टप्प्यावर पोहोचला आहे. इस्रायल आणि अमेरिकेने इराणवर (US-Iran War) हल्ले तीव्र केले असतानाच, इराणनेही अमेरिकन तळांना लक्ष्य करत चोख प्रत्युत्तर दिले आहे. रशिया आणि चीनच्या पाठिंब्यामुळे हे युद्ध महायुद्धाच्या दिशेने सरकतेय की काय, अशी भीती व्यक्त होत आहे. याच पार्श्वभूमीवर ‘चीनचा नॉस्ट्रॅडॅमस’ (Chinese Nostradamus) म्हणून ओळखले जाणारे प्राध्यापक जुएकिन जियांग (Professor Jiang Xueqin) यांची भविष्यवाणी सध्या सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहे.

कोण आहेत जुएकिन जियांग?

• ओळख: जियांग हे चीनमधील तत्वज्ञान आणि इतिहासाचे नामवंत प्राध्यापक आहेत.

• शिक्षण: त्यांनी अमेरिकेतील प्रतिष्ठित येल कॉलेजमधून पदवी प्राप्त केली आहे.

• व्यासपीठ: ते ‘प्रोडक्टिव्ह हिस्ट्री’ या लोकप्रिय यूट्यूब चॅनलच्या माध्यमातून जागतिक भू-राजकीय घडामोडींचे विश्लेषण करतात.

तीन मोठी भाकिते: दोन ठरली तंतोतंत खरी! | | Juekin Jiang prediction

जियांग यांनी २०२४ मध्ये एका ऑनलाईन लेक्चरदरम्यान तीन महत्त्वाचे दावे केले होते. त्यापैकी दोन घटना जशाच्या तशा घडल्याने त्यांच्या तिसऱ्या धडकी भरवणाऱ्या दाव्याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे:

1. पहिले भाकीत: डोनाल्ड ट्रम्प पुन्हा अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष होतील. (खरे ठरले)

2. दुसरे भाकीत: सत्तेत आल्यानंतर ट्रम्प इराणसोबत युद्धाची घोषणा करतील. (खरे ठरले)

3. तिसरे (सर्वात धक्कादायक) भाकीत: या युद्धात बलाढ्य अमेरिका इराणकडून पराभूत होईल.

अमेरिका का हरणार? जियांग यांनी मांडलेली ३ प्रमुख कारणे:

प्राध्यापक जियांग यांच्या मते, अमेरिकेला हे युद्ध जिंकणे खालील कारणांमुळे अशक्य होईल:

• इराणची भौगोलिक स्थिती: इराणचा डोंगराळ भाग अमेरिकन लष्करासाठी अत्यंत आव्हानात्मक ठरेल.

• पुरवठा साखळीतील अडथळे: लांबची ‘सप्लाय लाईन’ टिकवून ठेवणे अमेरिकेसाठी खर्चिक आणि कठीण होईल.

• अंतर्गत विरोध: युद्धाच्या दीर्घकाळ ओढल्या जाणाऱ्या स्वरूपामुळे खुद्द अमेरिकेतूनच या युद्धाला मोठा विरोध होईल.


LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here