युद्धाचा भडका! डोनाल्ड ट्रम्प इराण धमकीनंतर अमेरिकेचे अण्वस्त्र तळांवर भीषण हल्ले

0

मुंबई,दि.२८: जागतिक राजकारणात खळबळ उडवून देणारी ‘डोनाल्ड ट्रम्प इराण धमकी’ आता प्रत्यक्ष युद्धाच्या मैदानात उतरली आहे. अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी इराणमधील अण्वस्त्र सुविधांवर अमेरिका आणि मित्रराष्ट्रांनी एकत्रितपणे मोठा हल्ला केल्याची अधिकृत पुष्टी केली आहे. इराणला नवीन न्युक्लिअर सुविधा उभारण्यापासून रोखणे हा या हल्ल्याचा मुख्य उद्देश असल्याचे ट्रम्प यांनी स्पष्ट केले.

शस्त्रं खाली ठेवा अन्यथा मृत्यू निश्चित

डोनाल्ड ट्रम्प यांनी त्यांच्या ‘ट्रुथ सोशल’ मीडिया अकाऊंटवर एक व्हिडिओ शेअर केला आहे. या व्हिडिओमध्ये डोनाल्ड ट्रम्प इराण धमकी देताना म्हणाले की, “जर इराणने तात्काळ आपली शस्त्रं खाली ठेवली नाहीत, तर त्यांना त्याचे गंभीर परिणाम भोगावे लागतील. इराणकडे कधीही अण्वस्त्र असू शकत नाही आणि अमेरिका त्यांचे सर्व अण्वस्त्र तळ नष्ट करण्यास कटिबद्ध आहे.”

लष्करी तळांना निर्वाणीचा इशारा

ट्रम्प यांनी इस्लामिक रिव्होल्यूशनरी गार्ड, सशस्त्र दल आणि पोलिसांना उद्देशून म्हटले आहे की, “आज रात्री तुम्ही तुमची शस्त्रं खाली ठेवावीत आणि कोणताही प्रतिकार करू नये. अन्यथा, तुम्हाला निश्चित मृत्यूला सामोरे जावे लागेल. जे सैनिक शस्त्रे टाकतील त्यांना योग्य वागणूक दिली जाईल, मात्र प्रतिकार करणाऱ्यांचा नायनाट केला जाईल.”

क्षेपणास्त्र उद्योग मातीत मिसळणार

डोनाल्ड ट्रम्प इराण धमकी सत्रात पुढे म्हणाले की, गेल्या ४७ वर्षांपासून इराणी राजवटीने ‘डेथ टू अमेरिका’चा जयघोष करत निष्पाप लोकांचे रक्त सांडले आहे. “आम्ही इराणची क्षेपणास्त्र प्रणाली आणि त्यांचा संपूर्ण क्षेपणास्त्र उद्योग मातीत मिसळणार आहोत. तसेच त्यांच्या नौदलाचाही नाश केला जाईल,” असे त्यांनी ठामपणे सांगितले.

युद्धाची पार्श्वभूमी आणि जून २०२५ ची घटना

या संघर्षाची ठिणगी आठ महिन्यांपूर्वी पडली होती. जून २०२५ मध्ये इस्रायलने इराणच्या अण्वस्त्र केंद्रांवर बॉम्बफेक केली होती, ज्याला इराणने ५५० बॅलिस्टिक मिसाइल आणि १,००० ड्रोन्सनी प्रत्युत्तर दिले होते. त्यावेळेस अमेरिकेने इस्रायलच्या बाजूने लढताना इराणच्या मुख्य तीन अण्वस्त्र सुविधांना लक्ष्य केले होते. तेव्हापासून असलेला तणाव आता या ताज्या हल्ल्याने शिगेला पोहोचला आहे.

इराणी जनतेला उद्देशून ट्रम्प म्हणाले की, “तुमच्या स्वातंत्र्याची वेळ आता जवळ आली आहे.” या विधानामुळे इराणमध्ये सत्तापालटाचे संकेतही मिळत आहेत.


LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here