आमिष दाखवून अल्पवयीन मुलीवर अत्त्याचार

0

सातारा,दि.5: अल्पवयीन मुलीवर बलात्कार केल्याची घटना समोर आली आहे. 14 वर्षीय मुलीवर मित्रानेच बलात्कार केल्याची घटना घडली आहे. साताऱ्यातील या घटनेने एकच खळबळ उडाली आहे. या प्रकरणातील आरोपी हा सुद्धा अल्पवयीनच असल्याची माहिती समोर आली आहे. या प्रकरणी पोलिसांनी गुन्हा दाखल केला असून अधिक तपास सुरू आहे.

14 वर्षीय पीडित मुलीची आरोपीसोबत ओळख होती. याच अल्पवयीन आरोपीने मुलीचं अपहरण केलं. तिला आमिष दाखवून आरोपीने पळवून नेले होते. मुलगी बेपत्ता झाल्याने तिच्या कुटुंबीयांनी पोलिसांत तक्रार केली. ऑगस्ट महिन्यात या मुलीचं अपहरण झालं होतं. या प्रकरणी साताऱ्यातील शाहुपुरी पोलीस ठाण्यात तक्रार दाखल करण्यात आली असून पोलीस अधिक तपास करत आहेत.

अपहरण झाल्याच्या तक्रारीनंतर पोलिसांनी आपला शोध सुरू केला. अखेर दोन डिसेंबर रोजी अल्पवयीन मुलगा आणि मुलगी हे कोल्हापूर येथे असल्याची माहिती पोलिसांना मिळाली. त्यानंतर दोघांनाही कोल्हापुरातून साताऱ्यात आणले. मग पीडित मुलीची वैद्यकीय तपासणी सुद्धा करण्यात आली. पीडित मुलीने पोलिसांना सांगितले की, तिच्यावर सातारा आणि कोल्हापूर येथे नेऊन अत्याचार करण्यात आले. लोकमतने यासंदर्भात वृत्त दिलं आहे.


LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here