अँड्रॉइड फोनद्वारे बँकिंग सेवा वापरणाऱ्यांनी सावध राहण्याची गरज

0

दि.22 : सध्याच्या काळात अनेकजण ऑनलाईन व्यवहार करतात. बरेचजण मोबाईलद्वारे बँकिंग सेवांचा वापर करतात. अलीकडच्या काळात ऑनलाईन फसवणुकीचे प्रकार वाढले आहेत. अँड्रॉइड फोन वापरणाऱ्यांची संख्या जास्त आहे. अँड्रॉइड फोनद्वारे बँकिंग सेवांचा वापर करणाऱ्यांनी सावध राहण्याची गरज आहे.

देशाच्या फेडरल सायबर सिक्युरिटी एजन्सीने एका ताज्या ॲडव्हायझरीमध्ये म्हटले आहे की, भारतीय सायबर स्पेसमध्ये बँकिंग ट्रोजन मालवेअर (Trojan Malware) सापडले आहे. हे ट्रोजन मालवेअर अँड्रॉइड फोनचा वापर करणाऱ्या बँक ग्राहकांवर सायबर हल्ल्यासाठी डिझाइन करण्यात आले आहे. या मालवेअरने आधीच 27 पेक्षा जास्त सार्वजनिक आणि खाजगी क्षेत्रातील बँकांना लक्ष्य केले आहे.

सीईआरटी-इनने (भारतीय कम्प्यूटर इमरजन्सी रिस्पॉन्स टीम) म्हटले आहे की, सार्वजनिक आणि खाजगी क्षेत्रातील 27 पेक्षा जास्त भारतीय बँकांच्या ग्राहकांना आधीच या सायबर हल्लेखोरांनी लक्ष्य केले आहे. सायबर हल्ल्यांचा सामना करण्यासाठी तसंच फिशिंग, हॅकिंग आणि ऑनलाइन हल्ल्यांपासून सायबर स्पेसचे संरक्षण करण्यासाठी सीईआरटी-इन ही फेडरल तंत्रज्ञान शाखा आहे.

भारतीय कम्प्यूटर इमरजन्सी रिस्पॉन्स टीम (CERT-In) कडून मंगळवारी जारी करण्यात आलेल्या ॲडव्हायझरीमध्ये म्हटले आहे की, फिशिंग मालवेअर ‘इन्कम टॅक्स रिफंड’च्या स्वरुपात दिसत आहे. यामुळे ग्राहकांच्या डेटाची गोपनीयता प्रभावीपणे धोक्यात येऊ शकते. परिणामी मोठ्या प्रमाणावर हल्ले आणि आर्थिक फसवणुकीची देखील शक्यता वर्तवण्यात आली आहे.

ॲडव्हायजरीमध्ये असे म्हटले आहे की भारतीय बँकिंग ग्राहकांना ड्रिनिक अँड्रॉइड मालवेअर (Drinik Android Malware) वापरून नवीन प्रकारच्या मोबाइल बँकिंग कँपेनद्वारे लक्ष्य केले जात असल्याचे निदर्शनास आले आहे. ड्रिनिकने 2016 मध्ये SMS चोरी करण्याच्या स्वरुपात सुरुवात केली होती. आणि अलीकडेच याचे बँकिंग ट्रोजन विकसित झाले आहे. यामुळे फिशिंगचा धोका वाढला आहे. युजर्सची गोपनीय बँकिंग माहिती प्रविष्ट करण्यास हा मालवेअर भाग पाडतो. त्यामुळे तुम्ही मोबाइल बँकिंग वापरताना सावधानता बाळगणे अत्यंत आवश्यक आहे.


LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here