दि.28: Salman Khan On The Kashmir Files: अभिनेता सलमान खानने (Salman Khan) द काश्मीर फाईल्स चित्रपटावर प्रतिक्रिया दिली आहे. विवेक अग्निहोत्री (Vivek Agnihotri) दिग्दर्शित द काश्मीर फाईल्स (The Kashmir Files) चित्रपट चर्चेत आहे. द कश्मीर फाइल्स (The Kashmir Files) चित्रपट हिट ठरत आहे. 11 मार्च रोजी प्रदर्शित झाल्यानंतर, चित्रपटाने अवघ्या दोन आठवड्यात 200 कोटी रुपयांचा टप्पा ओलांडला आणि आता 230 कोटी रुपयांच्या जवळ पोहोचला आहे. सत्य दाखविल्याबद्दल चित्रपटाचे सर्वत्र कौतुक होत असतानाच, चित्रपटाचे समर्थन न केल्याने बॉलीवूडला ट्रोल करण्यात येत आहे.
चित्रपट 1990 मध्ये काश्मिरी पंडितांवर झालेल्या अत्याचारावर आधारित आहे. आमिर खान (Aamir Khan), अक्षय कुमार (Akshay Kumar), यामी गौतम, मनोज बाजपेयी यांसारख्या अनेक कलाकारांनी या चित्रपटाचे कौतुक केले आहे. त्यानंतर आता बॉलिवूडचा सुपरस्टार अभिनेता सलमान खाननेही (Salman Khan) या चित्रपटाबद्दल पहिली प्रतिक्रिया दिली आहे.
मिळालेल्या माहितीनुसार सलमान खानने ‘द कश्मीर फाइल्स’ हा चित्रपट पाहिला. हा चित्रपट पाहिल्यानंतर सलमानने थोडासाही वेळ वाया न घालवता अभिनेते अनुपम खेर (Anupam Kher) यांना फोन केला. यावेळी सलमानने अनुपम खेर यांच्याशी बातचीत करताना या चित्रपटाचे मला फार कौतुक आहे. या चित्रपटाला मिळालेल्या यशाबद्दल तुमचे खास अभिनंदन, असे त्याने म्हटले.
‘नवभारत टाइम्स’शी बोलताना अनुपम खेर यांनी याबाबतचा खुलासा केला आहे. ‘द कश्मीर फाइल्स’ हा चित्रपट पाहिल्यानंतर कोणकोणत्या कलाकारांनी त्यांचे कौतुक केले असा प्रश्न विचारला होता. त्यावर ते म्हणाले, ‘बॉलिवूड अभिनेता सलमान खानने चित्रपट पाहिल्यानंतर फोन केला आणि त्याने माझे अभिनंदन केले.’
अनुपम खेर आणि सलमान खान यांनी अनेक सुपरहिट चित्रपटांमध्ये काम केले आहे. ‘द कश्मीर फाइल्स’च्या यशावर बॉलिवूडने पूर्णपणे मौन बाळगल्याचा आरोप केला जात आहे. यावर अनुपम खेर म्हणाले, या चित्रपटाच्या यशाने सर्वांनाच धक्का बसला आहे. हिंदी सिनेसृष्टीही फार धक्क्यात आहेत, असे मला वाटतं. याबाबत विविध प्रतिक्रियाही उमटताना पाहायला मिळत आहे.