Aadhaar-Ration Link : अशा प्रकारे आधार कार्ड रेशन कार्डला करा लिंक, मिळतील हे फायदे

0

दि.22: रेशन कार्ड (Ration Card) धारकांसाठी महत्वाची बातमी आहे. रेशन कार्डद्वारे कमी किंमतीत रेशन मिळण्यासोबतच आणखी अनेक फायदे मिळतात. केंद्र सरकारने ‘वन नेशन वन रेशन कार्ड’ योजना सुरू केली आहे. आधार कार्ड (Aadhar Card) रेशन कार्डशी ऑनलाईन लिंक करता येईल.

देशातील लाखो लोकांना या योजनेचा लाभ मिळत असून, रेशनकार्ड अंतर्गत अन्नधान्यासोबत इतर अनेक फायदे मिळतात. यासाठी तुम्ही आधार कार्ड रेशनकार्डशी लिंक करून ‘वन नेशन वन रेशन कार्ड’ योजनेचा लाभ घेऊ शकता.

या मदतीने तुम्ही देशातील कोणत्याही राज्यातील रेशन कार्ड दुकानातून रेशन मिळवू शकता.

अशा प्रकारे आधार कार्ड ऑनलाइन लिंक करा

  1. यासाठी सर्वप्रथम http://uidai.gov.in या अधिकृत वेबसाइटवर जा.
  2. आता तुम्ही ‘Start Now’ वर क्लिक करा.
  3. आता येथे तुम्हाला तुमचा जिल्हा राज्याचा पत्ता भरावा लागेल.
  4. यानंतर ‘रेशन कार्ड बेनिफिट’ या पर्यायावर क्लिक करा.
  5. आता येथे तुम्ही तुमचा आधार कार्ड क्रमांक, शिधापत्रिका क्रमांक, ई-मेल पत्ता आणि मोबाईल क्रमांक इत्यादी भरा.
  6. ते भरल्यानंतर तुमच्या नोंदणीकृत मोबाईल नंबरवर एक OTP येईल.
  7. येथे OTP भरल्यानंतर, तुम्हाला तुमच्या स्क्रीनवर प्रक्रिया पूर्ण झाल्याचा संदेश मिळेल.
  8. ही सर्व प्रक्रिया पूर्ण होताच, तुमचे आधार पडताळले जाईल आणि तुमचे आधार तुमच्या रेशनकार्डशी लिंक केले जाईल.


LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here