दि.3 : शीतपेय (कोल्डड्रिंक्स) पिण्याची अनेकांना सवय असते. अनेक कार्यक्रमातही शीतपेयाचा वापर केला जातो. खाण्यापिण्याच्या पद्धतीत बदल झाल्याने त्याचा आरोग्यावर दुष्परिणाम जाणवत आहे. आपण बाजारातून मिळणाऱ्या गोष्टींवर जास्त अवलंबून राहू लागलो आहोत, पण या गोष्टी आपल्या आरोग्यासाठी हानिकारक ठरू शकतात. आज शीतपेये (कोल्डड्रिंक्स) पिणं ही एक फॅशन बनली आहे. शहरी जीवनशैलीत कोल्डड्रिंक्स न घेणारे लोक सापडणे मुश्कील आहे. याबाबत News 18 ने वृत्त दिले आहे.
आता अमेरिकेच्या एका संशोधनातून शीतपेयांच्या अधिक वापराबाबत सावधगिरी बाळगण्याचा इशारा दिला आहे. डेलीमेलच्या बातमीनुसार, अभ्यासात असे म्हटले आहे की असे पदार्थ किंवा शीतपेये ज्यात कृत्रिम गोडवा वापरला जातो, ते लठ्ठपणा आणखी वाढवू शकतात. वास्तविक, शीतपेयांमध्ये कृत्रिम स्वीटनरचा (artificial sweetener) वापर केला जातो. यामुळे भूक वाढते, ज्यामुळे लोकांना पुन्हा पुन्हा खाण्याची इच्छा होते.
कृत्रिम स्वीटनरने भूक वाढते
विशेष म्हणजे लोक वजन कमी करण्यासाठी सहसा डाएट ड्रिंक्स वापरतात. पण, नवीन संशोधनानुसार स्वीटनरमुळे जास्त भूक लागते आणि लोक जास्त कॅलरीजचा आहार वापरू लागतात. युनिव्हर्सिटी ऑफ साउथर्न कॅलिफोर्नियाच्या संशोधकांनी काही लोकांना आहारात पेय देऊन त्यांना संशोधनात सामील करून घेतले आणि या लोकांना भूक कमी आहे का? हे तपासण्याचा प्रयत्न केला. स्वीटनर सहसा सॉफ्ट किंवा डाएट ड्रिंकमध्ये वापरला जातो. स्वीटनर हा सुक्रालोजचा एक प्रकार आहे. याशिवाय डाएट कोक सारख्या पेयांमध्येही एस्पार्टेमचा वापर केला जातो. हे पदार्थ कृत्रिमरित्या तयार केले जातात.
मेंदूकडे भूक वाढीचा संदेश जातो
अभ्यासात महिला आणि पुरुषांची समान संख्या होती. त्यांना तीन वर्गात विभागले गेले – निरोगी वजन असलेले लोक, जास्त वजन असलेले लोक आणि खूप लठ्ठ लोक. काही लोकांना मानक स्वीटर दिले गेले तर काहींना त्याचा सब्सटीट्यूट देण्यात आला. शेवटी पाणी दिले गेले. दोन तासांनी मेंदूचा एमआरआय करण्यात आला.
याशिवाय हार्मोन चाचणीसाठी रक्ताचे नमुनेही घेण्यात आले. संशोधनादरम्यान, हे देखील पाहिले गेले की या लोकांनी शीतपेयानंतर किती वेळा अन्न खाल्ले. अभ्यासात असे आढळून आले की लठ्ठ लोक आणि स्त्रिया ज्यांनी कृत्रिम गोड पदार्थ घेतले त्यांच्या मेंदूचा भाग भुकेसाठी सक्रिय केला गेला, ज्यामुळे भुकेची इच्छा निर्माण झाली होती. त्याऐवजी ज्यांना साध्या साखरेचे पेय दिले गेले होते, त्यांना भूकेची फारशी इच्छा नव्हती.