वार फिरलय कारण या गावात कुणाला मतदान करायचं ते ठरलयं

0

सोलापूर,दि.24: सोलापूर लोकसभा मतदार संघात काँग्रेसच्या आमदार प्रणिती शिंदे आणि भाजपा आमदार राम सातपुते यांच्यात दुरंगी लढत होणार आहे. मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील यांनी मराठा आरक्षणाला विरोध करणाऱ्यांना पाडा असे आवाहन केले आहे.

मनोज जरांगे यांनी कोणत्याही पक्षाला समर्थन दिले नाही. सोलापूर जिल्ह्यातील शिवसेना ठाकरे गटाचे कट्टर शिवसैनिक धनाजी राजे भोसले यांनी कोंडी गावातून आमदार प्रणिती शिंदे यांना 95 टक्के मतदान होणार असल्याचा दावा केला आहे.

View this post on Instagram

A post shared by SolapurVarta (@solapur_varta)

गोरगरीब जनता शेतकऱ्यांवर अन्याय करणाऱ्या बीजेपी सरकारला धडा शिकवा असे आवाहन धनाजी भोसले यांनी केले आहे. मराठा समाजाची आरक्षणाबाबत दिशाभूल केल्यामुळे मराठा समाज पूर्णपणे बीजेपी विरोधात मतदानाचा हक्क बजावणार असल्याचे भोसले यांनी सांगितले.

आमची चुकी झाली आम्ही दहा वर्ष बीजेपीचा खासदार निवडून दिला तो एका कारणामुळे उद्धव साहेबांच्या आदेशामुळे. आता ही वेळ परत येणार नाही म्हणूनच शिवसैनिकांवर बदला घेण्याची वेळ आली आहे असेही भोसले म्हणाले.


LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here