शिवसेना नेते संजय राऊत यांना दिलासा नाहीच

0

मुंबई,दि.27: कथित पत्राचाळ घोटाळा प्रकरणी अटक करण्यात आलेले शिवसेनेचे नेते खासदार संजय राऊत (Sanjay Raut) न्यायालयीन कोठडीत आहेत. पत्राचाळ गैरव्यवहार प्रकरणात शिवसेनेचे खासदार संजय राऊत (Sanjay Raut) यांचा आर्थर रोड कारागृहामध्ये मुक्काम वाढला आहे. न्यायालयाने संजय राऊत यांच्या जामीन अर्जावर 10 ऑक्टोबरपर्यंत सुनावणी पुढे ढकली आहे.

गोरेगाव येथील पत्राचाळ घोटाळा प्रकरणात संजय राऊत यांना ईडीने जून महिन्यात अटक केली होती. त्यानंतर राऊत यांना कोर्टाने न्यायालयीन कोठडी सुनावली होती. राऊत यांचा मुक्काम हा आर्थर रोड कारागृहामध्ये हलवण्यात आला आहे. आज राऊत यांना पुन्हा PMLA न्यायालयात हजर केले असता संजय राऊत यांच्या जामीन अर्जावर जोरदार सुनावणी झाली. यावेळी 10 ऑक्टोबरपर्यंत सुनावणी पुढे ढकललेली आहे.

संजय राऊत यांचे वकील अशोक मुंदरगी यांनी केलेला युक्तीवाद

  • एकमेकांशी पैशाची देवाण घेवाण करणे हा गुन्हा होत नाही
  • आजपर्यंत याबद्दल कोणताही पुरावा तपास यंत्रणा देऊ शकलेल्या नाहीत
  • संजय राऊत यांच्यामुळे पत्रा चाळ प्रोजेक्टमध्ये गुरू आशिष कंपनीला मोठा फायदा झाला याबद्दल कोणताही पुरावा तपास यंत्रणा देऊ शकल्या नाहीत
  • स्वप्ना पाटकर आणि वर्षा राऊत यांनी अलिबाग येथून जमीन घेतली
  • यात जेव्हा स्वप्ना पाटकर यांची वेळोवेळी चौकशी करण्यात आली
  • त्यावेळी पहिल्यांदा स्वप्ना पाटकर यांनी मला माहित नाही सांगितलं
  • दुसऱ्या जबाबात मला माहित आहे सांगितलं
  • तिसऱ्या जबाबात माझा नवऱ्याने जमीन घेतल्याचे सांगितले
  • वेळोवेळी स्वप्ना पाटकर यांनी जबाब बदलला आहे
  • एकमेकांशी पैशाची देवाण घेवाण करणे हा गुन्हा नाही
  • तसेच संजय राऊत, प्रवीण राऊत, पाटकर कुटुंबीय हे अनेकदा बाहेर पर्यटनासाठीही गेलेले आहेत
  • यातील अनंत पाटील जे साक्षीदार आहेत. त्यांनी प्रवीण राऊत यांच्याकडून 50 लाखांचे कर्ज घेतलेलं आहे
  • हे कर्ज का पेडिंग ठेवलंय
  • या संपूर्ण प्रकरणात प्रत्यक्ष किंवा अप्रत्यक्ष संजय राऊत यांचा काहीही संबंध नाही. मात्र ओढून ताणून त्यांंचे नाव घेतलं गेलेलं आहे.
  • परदेश प्रवास हा या सर्वांनी मिळून अनेकदा केला आहे
  • यामध्ये पाटकर, राऊत हे मित्र आहेत
  • परदेश प्रवासात एकमेकांना पैसे देण हा काही गुन्हा होऊ शकतो का ?
  • प्रवीण राऊत हे 2010 मध्ये गुरू आशिष कंपनीतून बाहेर पडलेले आहे.
  • या दोघांचं म्हणजेच संजय राऊत व प्रवीण राऊत यांचा व्यवहार दाखवला जातोय, तो 2014 मधला आहे
  • संजय राऊत, प्रवीण राऊत, पाटकर कुटुंबीय हे अनेकदा बाहेर पर्यटनासाठीही गेलेले आहेत
  • यातील अनंत पाटील जे साक्षीदार आहेत. त्यांनी प्रवीण राऊत यांच्याकडून 50 लाखांचे कर्ज घेतलेलं आहे
  • वाधवान आणि प्रवीण राऊत याच्यात ट्रायडेन्ट हाॅटेल मध्ये झालेल्या बैठकिचा मुद्दा यात जोडलेला आहे. ज्यात असं म्हटलंय की संजय राऊत याच्या राजकिय फायदा घेण्याचा विषय मांडला आहे. मात्र जबाबात तसा उल्लेखही नाही ती मिटिंग वेगळ्या विषयावर झालेली आहे.
  • स्वप्ना पाटकर यांनी एका चित्रपट काढला होता. त्या चित्रपटासाठी संजय राऊत यांनी देणगी म्हणून 50 लाख दिले गेले असं ईडीने त्यांच्या आरोपात म्हटलं आहे. पण ती देणगी ही वेगळ्या कारणासाठी दिली गेली होती.
  • आम्ही जागा मालकांना भेटलोच नाही. सर्वांशी व्यवहार हा संजय राऊत आणि सुजित पाटकर यांनी केला. असल्याचे स्वप्ना पाटकर यांनी म्हटले तसेच आम्ही फक्त रजिस्टर ऑफिसला सही करायला गेलेलो
  • सुजित पाटकरच जमिन मालकांसोबत पैशांचे व्यवहार करत असल्याचे आरोप केले आहेत
  • मात्र आरोप करताना आधी म्हटले आम्हाला माहित नाही जमीन मालक कोण आहे. मग तुम्हाला व्यवहार कसा झाला, कुणाशी झाला हे कसे कळाले. आधी सांगता मला कल्पना नाही, नंतर सांगतात की माहित आहे, त्याहून पुढे जाऊन सांगत की सुजित व्यवहार करत होता हेआरोपच चुकीच्या पद्धतीचे असल्याचे संजय राऊत यांचे ज्येष्ठ वकिल अशोक मुंदरगी यांनी केले.
  • तुम्ही तुमच्या नवऱ्याला (सुजित पाटकर) किंवा संजय राऊत यांना पैसे देताना किंवा मिटिंग करताना पाहिलं का? या ईडीच्या प्रश्नावर स्वप्ना पाटकर यांनी नाही, असे म्हटले आहे. तसेच आपण त्यांना थेट रजिस्टेशनच्या वेळीच पाहिल्याचे म्हटले आहे.


LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here