सोलापूर,दि.8 : सोलापूर महानगरपालिकेच्या वतीने कोव्हिड 19 लसीकरण सत्राचे आयोजन दि. 09/10/2021 वार शनिवार रोजी करण्यात आले आहे. सोलापूर शहरातील 37 केंद्रावर पहिला व दुसरा डोस देण्यात येणार आहे. तर उद्या विशेष लसीकरण सत्राचे आयोजन करण्यात आले नाही.
लसीकरणासाठी जास्तीत जास्त नागरिकांनी ऑनलाईन नोंदणी करावी. नियोजित वेळेत लसीकरण केंद्रावर आवश्य उपस्थित राहावे. कोविड सदृश्य लक्षणे असणाऱ्या रुग्णांनी लसीकरण केंद्रावर जाऊ नये व तात्काळ कोविड चाचणी करून घ्यावी. कोविड चाचणीचा अहवाल येईपर्यत लस घेण्याचे टाळावे, असे आवाहन महानगरपालिकेतर्फे करण्यात आले आहे.
कोव्हिड 19 या आजारापासून संरक्षण होण्यासाठी कोव्हॅक्सीन अथवा कोव्हिशिल्ड लसीचे 2 डोस घेणे गरजेचे आहे. कोव्हॅक्सीन लसीचा पहिला डोस घेतल्यानंतर 28 दिवसानंतर त्याच लसीचा दुसरा डोस आवश्य घ्यावा. तसेच कोव्हिशिल्ड लसीचा पहिला डोस घेतल्यानंतर 84 दिवसानंतर त्याच लसीचा दुसरा डोस आवश्य घ्यावा कोव्हिड प्रतिबंधात्मक लसीचे 2 डोस घेतल्यानंतरच कोव्हिड 19 आजाराविरुध्द लढण्यासाठी अपेक्षित प्रतिकार शक्ती प्राप्त होते, असे महापालिकेतर्फे सांगण्यात आले आहे.