Omicron : जानेवारी-फेब्रुवारीपर्यंत भारतात कोविडची तिसरी लाट शिगेला पोहोचेल, आयआयटी प्राध्यापकाचा दावा

0

Omicron : आयआयटी (IIT) कानपूरचे प्रोफेसर मनिंदर अग्रवाल यांनी कोरोनाच्या पहिल्या आणि दुसऱ्या लाटेमध्येही त्यांचे संशोधन प्रसिद्ध केले होते. तेव्हाही त्यांची गणिते बर्‍याच प्रमाणात बरोबर असल्याचे सिद्ध झाले. यावेळीही त्यांनी तिसऱ्या लाटेबाबत अभ्यास केला आहे.

सोलापूर,दि.5: कोरोना विषाणूच्या (Corona Virus) नवीन प्रकार ओमिक्रॉनचा (Omicron) प्रभाव नवीन वर्षात दिसायला सुरुवात होईल. जानेवारी 2022 च्या शेवटच्या आठवड्यात आणि फेब्रुवारीच्या सुरुवातीला या प्रकाराने संक्रमित लोकांची संख्या शिखरावर असेल. इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी (IIT) कानपूर येथील संगणक विज्ञान आणि अभियांत्रिकी विभागातील प्राध्यापक आणि उपसंचालक मनिंदर अग्रवाल (Maninder Agarwal) यांनी हा दावा केला आहे.

प्रा. मनिंदर अग्रवाल यांच्या मते, ओमिक्रॉन प्रकारात जलद पसरण्याची लक्षणे आहेत, परंतु तो फारसे घातक दिसत नाहीत. हा प्रकार समूहातील प्रतिकारशक्तीला बायपास करण्याची शक्यता कमी आहे. तथापि, त्याच्या प्रसाराची लक्षणे अधिक आहेत आणि आतापर्यंत ती दक्षिण आफ्रिकेपासून ते जगभरात जेथे कोठे पसरली आहे, तिची लक्षणे गंभीर नसून सौम्य म्हणून दिसली आहेत.

डेल्टा व्हेरिएंट सारखा परिणाम होणार नाही

आयआयटी प्रोफेसरच्या संशोधनानुसार, भारतात त्याची तीव्रता कमी असण्याची शक्यता आहे, कारण 80 टक्के लोकांमध्ये नैसर्गिक प्रतिकारशक्ती विकसित झाली आहे. अशा परिस्थितीत त्याची लाट जरी आली तरी त्याचा परिणाम दुसऱ्या लाटेच्या डेल्टा प्रकारासारखा होणार नाही. प्रा. अग्रवाल यांनी त्यांचे संशोधन पहिल्या आणि दुसऱ्या लाटेमध्ये प्रसिद्ध केले होते, तरीही त्यांची गणना बर्‍याच अंशी बरोबर असल्याचे सिद्ध झाले होते.

या विषाणूची संसर्गाची क्षमता खूप जास्त असल्याने लसीकरण करून घेणे फार आवश्यक आहे. कोव्हॅक्सिन व कोविशिल्ड या दोन्ही लसी या व्हेरियंटवर उपयुक्त असल्याचं तज्ज्ञांचे मत आहे. अँटिबॉडीजना हा कोरोना व्हेरिअंट भेदू शकत नाही, हे तज्ज्ञांचं मत आहे, त्यामुळे घाबरण्याचं कारण नाही, कारण ओमिक्रॉनची लक्षणं सामान्य आहेत त्यामुळं म्हणून सर्वांनी लसीकरण करू घेण्याचे विनंती वजा आवाहन आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी केले आहे.


LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here