ST Worker’s Strike: एसटी कर्मचारी संपाच्या पार्श्वभूमीवर राज्य सरकारने घेतला मोठा निर्णय

0

दि.३१: एसटी कर्मचाऱ्यांच्या संपाच्या (ST Workers’ Strike) पार्श्वभूमीवर राज्य सरकारने (Maharashtra Government) मोठा निर्णय घेतला आहे. एसटी महामंडळाचे राज्य सरकारमध्ये विलिनीकरण करण्यात यावे यासाठी एसटी कर्मचारी संपावर आहेत. राज्य सरकारने वारंवार आवाहन करूनही कर्मचारी कामावर रुजू झाले नाहीत. संपकरी एस.टी. कर्मचाऱ्यांवर आमचा कोणताही राग नाही किंवा कोणताही आकस नाही. हे कर्मचारी वेगवेगळ्या आवाहनाला बळी पडले आहेत. त्यांच्या मनात गैरसमज पसरविले जात आहेत, असे सांगतानाच ३१ मार्च, २०२२ पर्यंत एसटीच्या संपकरी (ST Workers Agitation) कर्मचाऱ्यांनी कामावर रुजू व्हावे असं आवाहन परिवहन मंत्री अनिल परब (Anil Parab) यांनी दोन्ही सभागृहात केले. तसेच कोणाचीही नोकरी जाणार नाही, कर्मचारी कामावर आल्यानंतर कर्मचाऱ्यांच्या इतर मागण्याबाबत चर्चा करण्याची ग्वाही त्यांनी यावेळी दिली.

लवकरच एसटी महामंडळात मेगाभरती करण्यात येणार आहे. लवकरच 11 हजार कंत्राटी चालक आणि वाहकांची एसटी महामंडळात भरती होणार आहे. या संदर्भात एबीपी माझाने दिली आहे. आज अखेर हजर होणाऱ्या कर्मचाऱ्यांना कारवाईपासून दिलासा आहे. उद्या पासून एसटी महामंडळातील हजर न होणाऱ्या कर्मचाऱ्यांवर बडतर्फीची कारवाई करण्यात येणार आहे.

संपकरी एसटी कर्मचाऱ्यांवर उद्यापासून कारवाईला सुरूवात करणार असल्याची माहिती परिवहनमंत्री अनिल परब यांनी दिली आहे. त्यानंतर एसटीने हे पाऊल उचलले आहे. एसटी महामंडळात गाड्यांची संख्या देखील वाढवण्याचा निर्णय घेतला आहे. सुमारे 12 हजार लांब आणि मध्यम पल्ल्याच्या मार्गावर प्रति किलोमीटर प्रमाणे भाडेतत्त्वावर बसेस घेऊन चालवण्यात येणार आहेत. बेस्ट आणि पीएमपीएलच्या धर्तीवर एसटी महामंडळात निर्णय हा निर्णय घेण्यात आल्याची माहिती ‘एबीपी माझा’ला वरिष्ठ सूत्रांनी दिली आहे.

उद्यापासून कारवाईला सुरूवात

संपकरी एसटी कर्मचाऱ्यांवर उद्यापासून कारवाईला सुरूवात करणार आहे. आतापर्यंत कर्मचाऱ्यांना सातवेळा संधी दिली मात्र कामावर रूजू न झाल्याने उद्यापासून कारावाईला सुरूवात करणार असल्याची माहिती, परिवहनमंत्री अनिल परब यांनी दिली आहे.

अनिल परब म्हणाले, एसटी कर्मचाऱ्यांना कामावर हजर होण्याची मुभा आज संपत आहे. आज जे कर्मचारी हजर झालेले असतील त्यांच्यावर कारवाई करणार नाही. उपलब्ध कर्मचाऱ्यांना घेऊन एसटीची सेवा सुरू करत आहे. तसेच 11 हजार कंत्राटी कर्मचाऱ्यांना सोबत घेऊन एसटीची सेवा सुरू करत आहे. जे कामावर येत नाहीत म्हणजे त्यांना नोकरीची गरज नाही, त्यांच्यावर नियमानुसार केली जाणार आहे.


LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here