काँग्रेसच्या या बड्या नेत्यानी घेतली केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांची भेट

0

दि.29 : पंजाब काँग्रेसमध्ये घमासान सुरू असताना माजी मुख्यमंत्री आणि काँग्रेसचे वरिष्ठ नेते कॅप्टन अमरिंदर सिंग केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांची भेट घेतली आहे. अमित शहा यांच्या निवासस्थानी कॅप्टन अमरिंदर सिंग आणि केंद्रीय गृहमंत्र्यांची बैठक झाली.

पंजाब काँग्रेसमध्ये उलथापालथ होत असताना सर्वांचे डोळे राज्याचे माजी मुख्यमंत्री कॅप्टन अमरिंदर सिंग यांच्यावर होते. सिद्धूचा राजीनामा आणि पंजाबमधील नवीन मंत्र्यांना खात्यांचे वाटप झाल्यानंतर कॅप्टन मंगळवारी दिल्लीला पोहोचले. यासोबतच त्यांची गृहमंत्री अमित शहा यांच्याशी भेट घेतल्याने आता ते भाजपमध्ये जाणार असल्याचं स्पष्ट होत आहे. त्यामुळे येत्या निवडणुकीत काँग्रेसला मोठा धक्का बसण्याची शक्यता आहे.

अमरिंदर सिंग लवकरच काँग्रेसला रामराम करून हाती कमळ घेऊ शकतात. त्यांना राज्यसभेवर पाठवून महत्त्वाची मंत्रालयाची जबाबदारी दिली जाऊ शकते. कॅप्टन अमरिंदर सिंग यांना कृषिमंत्रिपद दिलं जाण्याची शक्यता आहे. गेल्या अनेक महिन्यांपासून हरयाणा, पंजाबमध्ये शेतकऱ्यांचं आंदोलन सुरू आहे. त्यामध्ये हजारो शेतकऱ्यांचा सहभाग आहे. केंद्राचे तीन कृषी कायदे रद्द करण्याची मागणी त्यांनी लावून धरली आहे. सिंग यांनी कृषिमंत्री करून मोदी सरकार शेतकऱ्यांची नाराजी दूर करण्याची जबाबदारी त्यांच्याकडे देऊ शकतं.

मुख्यमंत्रीपद सोडल्यानंतर भाजप नेते आणि हरियाणाचे मंत्री अनिल विज यांनी कॅप्टन अमरिंदर सिंग यांना भाजपमध्ये येण्याचे आमंत्रणही दिले होते.


LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here