Rajya Sabha Election: राज्य सभेच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर असदुद्दीन ओवेसींनी स्पष्ट केली भूमिका

0

दि.7: Rajya Sabha Election: राज्यसभेच्या सहाव्या जागेसाठी शिवसेना (Shivsena) व भाजपामध्ये (BJP) आमदारांना आपल्याकडे वळवण्यासाठी जोरदार रस्सीखेच सुरू आहे. निवडणूक जिंकण्यासाठी सत्ताधारी आणि विरोधक दोघांकडून मतांची जुळवाजुळव करण्यात येत आहे. सहयोगी व अपक्ष आमदारांनी नाराजीचा सूर लावल्याने शिवसेनेसाठी दुसरी जागा निवडून आणण्याचे आव्हान आहे. त्यामुळे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) हे यात लक्ष घालत आहेत. दरम्यान एमआयएम पक्षाचे खासदार असदुद्दीन ओवेसी (Asaduddin Owaisi) याबाबत भाष्य केले आहे. भाजपाला पराभूत करण्यासाठी महाविकास आघाडीने मदत मागावी असं आवाहन ओवेसी यांनी केले आहे.

“महाविकास आघाडीतर्फे कोणीही माझ्यासोबत किंवा आमच्या आमदारासोबत संपर्क साधलेला नाही. त्यामुळे आम्ही वाट पाहू. जर महाविकास आघाडीला आमची गरज असेल तर त्यांनी आमच्याशी संपर्क साधावा. गरज नसेल तर ठीक आहे आम्ही आमचा निर्णय घेऊ. आम्ही आमच्या आमदारांसोबत बोलत आहोत आणि एक किंवा दोन दिवसांत याबाबत निर्णय घेऊ,” असे असदुद्दीन ओवेसी म्हणाले.

दरम्यान, राज्यसभेच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी शिवसेना व सहयोगी आमदारांची बैठक घेत कशाचीही भीती न बाळगता शिवसेनेच्या दोन्ही उमेदवारांना निवडून आणण्यासाठी मतदान करण्याचे आवाहन केले आहे. यासंदर्भात मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी सोमवारी सायंकाळी वर्षां या सरकारी निवासस्थानी शिवसेनेच्या व सहयोगी आमदारांशी संवाद साधला. महाविकास आघाडी सरकारमधील मंत्र्यांवर टक्केवारीचा आरोप करत घरचा अहेर देणारे शिवसेनेचे माजी व आता अपक्ष आमदार आशीष जैस्वाल यांच्यासह इतर अपक्ष आमदारही बैठकीला उपस्थित होते.


LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here