संशोधनातून शिव्या देणाऱ्या लोकांबाबत महत्वाची माहिती आली समोर

0

दि.25 : अनेकजण शिव्या देण्यात पारंगत असतात. शिव्या देण्याची अनेकांची वेगवेगळी पद्धत असते. अनेकांच्या दिवसाची सुरुवात शिव्यापासून होते. काही लोकांना प्रत्येक गोष्टीत शिव्या देण्याची सवय असते. एखाद्याला शिव्या देण्याची सवय असली की तो व्यक्ती कोणत्याही परिस्थितीत शिव्या देतो. घरी असो किंवा बाहेर कुठे, हे लोक तुम्हाला प्रत्येक ठिकाणी शिव्या देताना दिसतील.

शिव्या देणारी लोकं तशी तर कोणालाच आवडत नाही. मात्र, आता जो नवा रिसर्च समोर आला आहे तो जाणून तुम्हीही शिव्या देत नसाल तरी त्या द्यायला सुरुवात करताल. नव्या रिसर्चमध्ये समोर आलं आहे, की जे लोक वारंवार शिव्या देतात, त्यांचं आयुष्य अधिक असतं. शिव्या दिल्यानं त्यांचं फ्रस्ट्रेशन कमी होतं. सोबतच डोकंही शांत राहातं. अशात रिसर्चमध्ये शिव्या देणं आरोग्यासाठी फायद्याचं असल्याचं म्हटलं आहे. हा अभ्यास न्यूजर्सीच्या (New Jersy) कीन युनिव्हर्सिटीच्या रिसर्चर्सनं केला आहे. यातून असं सिद्ध झालं आहे, की शिव्या देणारे लोक हे समाधानी असतात.

कीन युनिव्हर्सिटीनं आपल्या या रिसर्चमध्ये (Research) काही विद्यार्थ्यांना सहभागी करून घेतलं होतं. या विद्यार्थ्यांचे हात बर्फाच्या पाण्यात बुडवून ठेवण्यात आले. यात असं समोर आलं, की जे विद्यार्थी या प्रक्रियेदरम्यान शिव्या देत होते, ते आपला हात थंड पाण्यात जास्त काळ ठेवू शकले. याच आधारे रिसर्चसनं आपल्या नव्या अभ्यासात म्हटलं, की शिव्या देणाऱ्या लोकांचं फ़्रस्ट्रेशन कमी होतं आणि माणसाचं डोकंही शांत राहातं.

स्ट्रेस कमी (Mental Stress) झाल्यास माणूस अधिक आयुष्य जगतो. स्टडीमध्ये हे समोर आलं, की जे लोक शिव्या देत नाहीत ते कठीण काळात लवकर हार मानतात. ते अधिक मानसिक तणावात असतात आणि याचा परिणाम त्यांच्या मानसिक आरोग्यावर होतो. अशात आता जर तुम्ही कधी शिव्या देणाऱ्या लोकांना भेटला तर समजून जा की ते तुमच्यापेक्षा अधिक आयुष्य जगणार आहेत.


LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here