Solapur : कोरोनाच्या पार्श्वभूमीवर सोलापूरचे जिल्हाधिकारी मिलिंद शंभरकर यांनी दिले हे आदेश

0

सोलापूर,दि.११: ओमिक्रॉन व्हेरिएंटचे (Omicron Variant) महाराष्ट्रात आढळून येत आहेत. वाढणाऱ्या रुग्णसंख्येच्या पार्श्वभूमीवर सरकार सतर्कता बाळगत आहे. सोलापूर जिल्ह्याचे जिल्हाधिकारी मिलिंद शंभरकर (Collector Milind Shambharkar) यांनी कोविड – १९ च्या (Covid – 19) पार्श्वभूमीवर लसीकरण बाबत आदेश काढले आहेत. कोविड – १९ चा धोका संभवतो त्यामुळे जास्तीत जास्त नागरिकांनी लसीचे दोन्ही डोस घेणे आवश्यक असल्याचे जिल्हाधिकारी यांनी नमूद केले आहे.

कोविड-१९ (Covid – 19) या विषाणूच्या नियंत्रणासाठी लसीकरणाचे शहरामध्ये प्रभावी अमंलबजावणी होणकामी शहरातील पेट्रोल पंप, रिक्षा, प्रवाशी वाहतूक, मोठे मॉल्स, बँका, मंगल कार्यालये, रेस्टॉरंट, वाईन शॉप, बिडी कारखाने व सर्व आस्थापने इ. गर्दीचे ठिकाणी लसीकरणाचे २ मात्रा घेतलेबाबत नागरिकांची तपासणी करुन लस घेणेबाबत लोकांमध्ये जनजागृती करुन प्रवृत्त करणे, प्रसंगी नियमानुसार दंडात्मक कारवाई करणे आवश्यक आहे. सदरच्या आदेशाची अंमलबजावणी पोलीस प्रशासन व महानगरपालिका यांनी समन्वय साधून शहरातील जास्तीत जास्त लोकांचे लसीकरण होणेसाठी नागरीकांना जागृत करण्याच्या सूचना दिलेल्या आहेत. असे सोलापूर महानगरपालिकेचे प्रभारी आयुक्त तथा जिल्हाधिकारी मिलिंद शंभरकर यांनी काढलेल्या आदेशात नमूद केले आहे.

यासंदर्भात जिल्हाधिकारी मिलींद शंभरकर यांनी बैठक घेऊन निर्देश दिले आहेत. बैठकीतील आदेशाप्रमाणे मनपा विभागीय कार्यालयाच्या कार्यक्षेत्रानुसार अधिकारी, डॉक्टर, पोलिस निरिक्षक, मुख्य आरोग्य निरिक्षक, आरोग्य निरिक्षक यांचे पथक तयार करणेत आले असून, सदर पथकाचे नियंत्रण अधिकारी म्हणून विभागीय अधिकारी हे काम पाहतील. विभागीय अधिकारी यांनी पथकातील सर्व सदस्यांचा समन्वय साधून त्यांच्या कार्यक्षेत्रातील आस्थापनांची दैनंदिन जास्तीत जास्त तपासणी करण्याबाबत नियोजन करुन तपासणी अहवाल सादर करावयाचा आहे.

कोविड प्रतिबंध अनुरुन वर्तन विषयक नियम व दंड याबाबत यापूर्वी दि.२९/११/२०२१ दिलेल्या निर्देशानुसार ज्या आस्थापनामध्ये हॅन्ड सॅनिटायझर, साबन, पाणी तापमापक इत्यादी बाबी उपलब्ध नसतील अशा आस्थापनांना दंडाची शास्ती करण्यात यावी.

१. कोवीड प्रतिबंधक वर्तनाचे पालन न करणाऱ्या कोणत्याही व्यक्तीला कसूर केल्याच्या प्रत्येक प्रसंगी र.रु५००/- दंड करणे.

२. ज्या आस्थापनेत ग्राहक, अभ्यागत यांचेकडून कोविड प्रतिबंधक वर्तनाचे पालन होणार नाही, त्या ग्राहक, अभ्यागत यांचेवर दंड लावण्या व्यक्तीरीक्त संबधीत आस्थापना, संस्था यांना सुध्दा र.रु.१०,०००/- इतका दंड करण्यात येईल. एखादया संस्थेत, आस्थापनेत कोविड प्रतिबंधक नियमांचे वारंवार उल्लंघन होत असल्यास सदर संस्था, आस्थापना कोविड १९ ची अधिसूचना अंमलात असेपर्यत बंद करण्यात येईल.

३. एखादया संस्थेकडून किंवा आस्थापनेकडून कोविड प्रतिबंधक वर्तनाचे किंवा प्रमाण कार्यचालन कार्यपध्दतीच (SOP) पालन करण्यात कसून केली जात असेल तर ती संस्था, आस्थापना प्रत्येक प्रसंगी र.रु.५०,०००/- इतक्या दंडास प्रात्र असेल त्याचप्रमाणे वारंवार कसून केल्यास कोविड १९ ची अधिसूचना अंमलात असेपर्यत बंद करण्यात येईल.

४. कोणत्याही खाजगी वाहतुक करणाऱ्या बस, चार चाकी वाहनात कोविड प्रतिबंधक वर्तनात कसून केल्याचे आढळण्यास वर्तनात कसून करणाऱ्या व्यक्तीस र.रु.५००/ व सेवा पुरविणारे वाहन चालक / वाहक यांना सुध्दा र.रु.५००/- इतका दंड करण्यात यावा. बस मालक यांचे बाबतीत र.रु.१०,०००/- इतका दंड करण्यात येईल. वारंवार कसून झाल्यास कोविड १९ ची अधिसूचना अंमलात असेपर्यंत मालक-एजन्सीचे लायसन्स काढून घेण्यात येईल किंवा तिचा परीचालन बंद करण्यात येईल.

सदर आदेशाचे उल्लंघन करणारी व्यक्ती / संस्था अथवा आस्थापना यांचेवर भारतीय दंड संहिता (४५ ऑफ १८६०) कलम १८८ मधील तरतूदीनुसार दंडनीय / कायदेशीर कारवाईस पात्र असून आपत्ती व्यवस्थापन अधिनियम २००५, साथ रोग नियंत्रण कायदयातील तरतूदी आणि इतर कायदे आणि विनिमय यानुसार कारवाई करणेत येईल. अशा व्यक्ती, संस्था अथवा आस्थापना यांचे विरुद्ध संबधीत पथकाने कारवाई करावी. असे जिल्हाधिकारी मिलिंद शंभरकर यांनी काढलेल्या आदेशात नमूद केले आहे.


LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here